karad hospital 
सातारा

वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात 50 बेडची होणार व्यवस्था

सचिन शिंदे

कऱ्हाड (सातारा) : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी येथील वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाचा काही भाग कोविड सेंटर करण्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी नुकतीच येथील उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी केली. आवश्‍यकता भासल्यास उपजिल्हा रुग्णालयातील यंत्रणाही कोविडसाठी तयार राहावी, यासाठी ऑक्‍सिजनची सुविधा करण्यासह अन्य उपाययोजना करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी डॉक्‍टरांना सूचना केल्या. 

कोरोना रुग्णांना उपचारासाठी अनेकदा बेड मिळत नसल्याची उदाहरणे घडत आहे. त्याचा विचार करून शासनाने आता उपजिल्हा रुग्णालयाचा काही भाग कोविड सेंटर करण्यासंदर्भातील कार्यवाही सुरू केली. जिल्हाधिकारी सिंह यांनी येथील उपजिल्हा रुग्णालयात भेट दिली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार, पालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके, उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रभारी वैद्यकीय अधीक्षक खराडे यांच्यासह तेथील डॉक्‍टर उपस्थित होते. 

जिल्हाधिकाऱ्यांनी उपजिल्हा रुग्णालयात कोविड सेंटर सुरू केल्यास काय उपाययोजना कराव्या लागतील, याची माहिती वैद्यकीय अधीक्षक व डॉक्‍टरांकडून घेतली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी कोविड सेंटरचा विचार करून तेथे ऑक्‍सिजनची सुविधा करण्यासह अन्य काही उपाययोजना करण्यासंदर्भात डॉक्‍टरांना सूचना केल्या. 

50 बेडची होणार व्यवस्था...  

वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील खालच्या मजल्यावर संभाव्य कोरोना सेंटर सुरू करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. तेथे सुमारे 50 बेडची उपलब्धता होईल, अशी व्यवस्था करण्याचे प्रयोजन आहे. तेथे ऑक्‍सिजन आणि व्हेंटिलेटरचीही व्यवस्था करण्याचे प्रयोजन आहे. तेथे 50 बेड उपलब्ध झाल्यामुळे कोरोना रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Revenue Court: महसूल न्यायालयाचे कामकाज मराठीतून, नवी 'एसओपी' लागू; प्रकरणांचा झटपट निपटारा होणार!

Nashik Drowning: ३ मुलं डोळ्यासमोर गटांगळ्या खायला लागली, आईने वाचवायला उडी मारली; बुडून चौघांचाही मृत्यू..

Mobile Recharge Hike : लवकरच मोबाईल रिचार्ज महाग होण्याची शक्यता, पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर दुसरा मोठा धक्का

Latest Marathi News Live Update : दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकेतील छेडछाड आता गुन्हा ठरणार

मी सागरची गर्लफ्रेंड, हळदीच्या कार्यक्रमात राडा; ८ लाखांचा खर्च, लग्न मोडताच वधुची पोलिसात धाव, नवरदेवाला अटक

SCROLL FOR NEXT