सातारा

सातारा : "थर्टी फर्स्ट' च्या सेलिब्रेशनची गावा गावांत तयारी; भजन, कीर्तनाचेही उपक्रम

प्रशांत गुजर

सायगाव (जि. सातारा) ः सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागताला अवघा एक दिवस उरला आहे, तर कोरोनामुळे गेले नऊ महिने शांततेत गेल्यामुळे शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातील तरुणाईने सेलिब्रेशनची जोरदार तयारी सुरू केली आहे. सध्या वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन, पार्ट्यांचे नियोजन सुरू असल्याचे ग्रामीण भागात दिसते.
 
शहराप्रमाणे ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात थर्टी फर्स्ट साजरा केला जातो. शेतामध्ये, फार्महाउस आदी ठिकाणी त्याचे आयोजन करून जोरदार तयारी चालू आहे. ढाबे, हॉटेल, बार या ठिकाणी सजावट, रंगरंगोटी केली जात आहे, तर आकर्षक विद्युत रोषणाई, डिजिटल बॅनर, बैठक व्यवस्था आदी नियोजनावर भर दिला जात आहे. काही ठिकाणी संगीतमय वातावरणासाठी ऑर्केस्ट्राचेही नियोजन केले आहे. या काळात मद्य, मटण, चिकनचा मोठ्या प्रमाणात फडशा पडणार आहे. कारण गेले नऊ महिने कोणत्याही प्रकारे तरुण वर्गाला एन्जॉय करता न आल्याने आता आलेली संधी त्यांना वाया घालवायची नाही, असे नियोजन ठरलेले आहे.

याला म्हणायचं विश्वास! तहसीलदार, डीवायएसपीची मुले शिकणार सरकारी शाळेत 
 
काही गावांत वारकरी सांप्रदायिक मडळांची नवीन वर्षाच्या स्वागतासाठी वेगळी तयारी चालू आहे. भजन, कीर्तन, ग्रंथ वाचन अशा प्रकारचे सोशल डिस्टन्स ठेवून कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. काही गावातील तरुण वर्ग नवीन वर्ष हे गुढीपाडवा असल्याने शांत आहेत, तर काही तरुण हे सरत्या वर्षात गावागावांत प्रबोधनपर कार्यक्रमांचे नियोजन करून स्वच्छता अभियान राबविण्याच्या तयारीत आहेत. मात्र, या सर्वांवर पोलिस यंत्रणेचीही करडी नजर असणार आहे.

माण तालुक्यात बिनविरोधला तिलांजली; स्थानिक गटांतच रंगणार लढती 

सरत्या वर्षाला निरोप देताना आजच्या तरुण पिढीने गावगावांत प्रबोधन कार्यक्रमाचे नियोजन करून नाचगाण्यासारखे हिडीस प्रकार टाळून होणारा वायफळ खर्च विधायक कामांसाठी घालवावा किंवा कोरोनामुळे उद्‌ध्वस्त झालेल्या कुटुंबांना मदत करावी. 

- अनुकूल चिकाटे, सामाजिक कार्यकर्ते

संपादन - सिद्धार्थ लाटकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT