Vishalgad Riots Shambhuraj Desai esakal
सातारा

Vishalgad Riots : गजापुरात दगडफेक, जाळपोळ करणाऱ्या दोषींना शोधून काढून कारवाई करणार; शंभूराज देसाईंचा इशारा

विशाळगडाच्या (Vishalgad Riots) परिसरात घडलेला प्रकार दुर्दैवी आहे.

हेमंत पवार

मराठा आरक्षणप्रश्नी मनोज जरांगे पाटील हे काय बोलले आहेत ते मी ऐकलेले नाही. मात्र, आवश्यकता असल्यास मी त्यांची भेट घेईन, असेही ते म्हणाले.

कऱ्हाड : विशाळगडाच्या (Vishalgad Riots) परिसरात घडलेला प्रकार दुर्दैवी आहे. अतिक्रमण विशाळगडावर होते आणि दगडफेक, जाळपोळ, मोडतोड तेथून चार किलोमीटर अलीकडे झाली. त्यामुळे अधिक सतर्कता घेतली असती, तर कदाचित हा अनर्थ टाळता आला असता. तेथील पालकमंत्र्यांनी प्रशासनाला कारवाईचे आदेश दिले आहेत. तेथील सर्व प्रकरणाची माहिती घेऊन दोषींना शोधून काढून कारवाई केली जाईल, असा इशारा पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी येथे दिला.

दरम्यान मराठा आरक्षणप्रश्नी मनोज जरांगे पाटील हे काय बोलले आहेत ते मी ऐकलेले नाही. मात्र, आवश्यकता असल्यास मी त्यांची भेट घेईन, असेही ते म्हणाले. पालकमंत्री देसाई यांनी आज येथील कोयना बॅंकेस भेट दिली. त्यादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. अॅड. उदयसिंह पाटील, बॅंकेचे अध्यक्ष रोहित पाटील, उपाध्यक्ष विजय मुठेकर, रयत कारखान्याचे संचालक प्रदीप पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

मंत्री देसाई म्हणाले, ‘‘लोकसभा निवडणुकीत आमचा स्ट्रायकिंग रेट ४७ आहे. आम्ही मायक्रोप्लॅनिंग केल्याने लोकसभेला चांगले यश मिळाले आहे. आम्ही विधानसभेच्या कामाला लागलो आहोत. जागा किती लढवायच्या हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मित्र पक्षाचे नेते ठरवतील. लवकरच त्यासंदर्भात बैठक होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Who Is Jamie Smith? टीम इंडियाची झोप उडवणारा जेमी स्मिथ कोण? ज्याने केलीय १५० धावांची ऐतिहासिक खेळी, मोडले अनेक विक्रम...

२५ वर्षांनी झी मराठीवर दिसणार लोकप्रिय अभिनेत्री, कधीकाळी ठरलेली गाजलेली नायिका; नव्या मालिकेतून करणार कमबॅक

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT