Wai Crime Sakal
सातारा

Wai Crime : कोयता, पिस्तुलचा धाक दाखवून चाळीस लाखाचे सोने लुटले; एक जण किरकोळ जखमी

सोन्याचे दागिने बनविणाऱ्या कारागीरांना कोयता आणि पिस्तुलचा धाक दाखवून सोन्याचे दागिने लुटून नेल्याची घटना वाई येथे घडली.

भद्रेश भाटे

वाई - सोन्याचे दागिने बनविणाऱ्या दोन बंगाली कारागीरांना कोयता आणि पिस्तुलचा धाक दाखवून चाळीस लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने रविवारी (ता. २८) रात्री लुटून नेल्याची घटना वाई येथे घडली. यावेळी एक जण किरकोळ जखमी झाला. याबाबत पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येथील सोने चांदी बाजारपेठेतील लक्ष्मीनारायण मार्केटमध्ये सोन्याचे दागिने बनविणाऱ्या संजय जयंता मयंती आणि मृत्युंजय जयंता मयंती या दोन बंगाली भावांची करागीरींची दुकाने आहेत. या ठिकाणी दररोज ते सोन्याचे दागिने घडविण्याचे काम करत असतात.

रविवारी रात्री बाजारपेठ बंद झाल्याचा गैरफायदा घेऊन पावसाळी कपडे व चेहऱ्याला मुखपट्टी लावलेल्या दोन अज्ञात युवकांनी सुरवातीला संजय मयंती याच्या दुकानात प्रवेश करून शटर अर्ध्यावर घेऊन कोयत्याचा आणि पिस्तुलाचा धाक दाखवून एका कामगाराला कोयत्याने किरकोळ मारहाण केली. दुकानात कामासाठी असलेले ३७८ ग्रॅम वजनाचे २५लाख ९५हजार ६००रुपयांचे सोने ताब्यात घेतले.

संजय मयंती याला व त्याच्या कारागीरांना दुकानात कोंडून ठेवले. यानंतर लगतच असलेल्या त्याचा भाऊ मृत्युंजय जयंती याच्या दुकानात प्रवेश करून कोयता पिस्तुलचा धाक दाखवून २०० ग्रॅम वजनाचे १३ लाख ७५ हजार किमतीचे सोने घेऊन पलायन केले. विष्णू मंदिर चौकात उभ्या केलेल्या दुचाकीवरून ते निघून गेले.

या प्रकरणात कारागीर आणि व्यापारी यांचे मिळून ३९ लाख ६९ हजार रुपयांचे सोने लुटून नेल्याचा गुन्हा वाई पोलिस ठाण्यात संजय मयंती यांनी दाखल केला आहे. याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली.

तातडीने पोलीस अधीक्षक समीर शेख, उपविभागीय पोलीस अधिकारी बाळकृष्ण भालचिम, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे तपासी अधिकारी, श्वानपथक, ठसे तज्ञ दाखल झाले. रात्री पासून कसून तपास सुरू आहे. लवकरच आम्ही संशयीतांना ताब्यात घेऊ असे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सांगितले. अधिक तपास पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Narwekar statement : अलिबाग येथे शेतकऱ्यांमधील वादाच्या व्हिडिओवरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा खुलासा

Maha Shivratri 2026 Song: नमो नमो शंकरा! कोट्यावधी चाहत्यांनी पाहिलं; तरीही पुन्हा ऐकावं वाटणारं भक्तिगीत

Latest Marathi News Live Update : महाशिवरात्रीनिमित्त कपिलेश्वर महादेव मंदिरावर फुलांची सुंदर सजावट

Maratha History : कोल्हापूरच्या छत्रपतींची समाधी पाकिस्तानच्या कराचीत कशी? मराठ्यांचा हा धगधगता इतिहास तुम्हाला माहिती असायलाच हवा

Nashik : त्र्यंबकेश्वरला जाताना भाजप खासदाराच्या कारला आग, काही क्षणात कार जळून खाक

SCROLL FOR NEXT