Dhom Dam Right Canal Burst Sakal
सातारा

Wai News : व्याजवाडीजवळ धोम धरणाचा उजवा कालवा फुटला, लाखो लिटर पाणी वाया

व्याजवाडी (ता. वाई ) जवळ धोम धरणाचा उजवा कालवा फुटला. अचानक कालवा फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले.

भद्रेश भाटे

वाई - व्याजवाडी (ता. वाई ) जवळ धोम धरणाचा उजवा कालवा फुटला. अचानक कालवा फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. सुदैवाने ओढ्यातून पाणी वाहून गेल्याने शेतीचे नुकसान टळले आहे. धोम धरणाच्या उजव्या कालव्याला १४.५ कमी अंतरावर व्याजवाडी गावाच्या हद्दीत कालव्याच्या तळातील स्लॅब फुटल्याने मोठे भगदाड पडले. त्यामुळे लाखो लिटर पाणी कालव्यातून वाहून गेले. पहाटे पाचच्या सुमारास हा प्रकार घडला.

मागील पन्नास दिवसांपासून कालव्यातून १९० ते २०० क्युसेक्सने पाणी पुरवठा सुरु होता. कालवा फुटून पाणी ओढ्यातून वाहून गेल्याने शेती नुकसानीचा अनर्थ टळला. मात्र मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेले. कालव्यातील पाणी बंद आले आहे.

मागील एक महिन्यापासून कालवा सुरु होता. कालवा सुरु करण्यापूर्वी या ठिकाणी डागडुजी केली असल्याचे पाटबंधारे सूत्रांनी सांगितले. गेल्या महिन्यात धोम धरणाचा डाव्या कालव्याला भगदाड पडून ऊस तोड कामगारांचे संसार उपयोगी साहित्य वाहून गेले होते.

यामुळे मागील काही दिवसांपासून पाण्या अभावी पिकांचे नुकसान होत आहे. पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता योगेश शिंदे, उपअभियंता निलेश ठोंबरे,शाखा अभियंता अजय गोळे यांनी घटनास्थळी भेट दिली असून तातडीने कालव्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Child Marriage : महाराष्ट्रात पुन्हा बालविवाह! कायद्याला चुकवून अल्पवयीन मुलीचं लग्न अन् अत्याचार, सात महिन्यांची गर्भवती

Vice President Election : NDA चा ‘राजकीय डाव’! उपराष्ट्रपतीपदासाठी सी. पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी, सध्या आहेत महाराष्ट्राचे राज्यपाल

Satara News:'स्वातंत्र्यदिनी राष्ट्रवादीकडून पिंपोडेत रास्ता रोको'; रस्ता खाेदल्याने अनेकांचे हातपाय मोडले, आंदोलनस्थळी लोकवर्गणी गोळा

Vidarbha Accident: दुर्दैवी घटना! 'भींत कोसळून तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू'; अकोट तालुक्यात पसरली शोककळा

Pune Accident: दुर्दैवी घटना! 'ट्रक व टॅंकरच्या अपघातात एकाच कुटूंबातील तिघांचा मृत्यू'; वर्षश्राद्धासाठी जाताना काळाचा घाला..

SCROLL FOR NEXT