शंभूराज देसाई sakal
सातारा

सातारा : पाणी योजनांना १४ कोटी ८९ लाखांचा निधी

२८ नळ पाणीपुरवठा योजनांचा समावेश

सकाळ वृत्तसेवा

मोरगिरी: पाटण तालुक्यातील नादुरुस्त नळ पाणीपुरवठा योजनांच्या कामासाठी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या मागणीवरून पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी २८ नळ पाणीपुरवठा योजनांसाठी १४ कोटी ८९ लाखांचा निधी मंजूर झाल आहे.पाटण तालुक्यात जुलै महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन डोंगरी व दुर्गम भागात वसलेल्या अनेक गावांतील नळ पाणीपुरवठा योजनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. गावातील ग्रामस्थांनी‌ निवेदनाव्दारे निधीची मागणी केली होती.

त्यानुसार नळ पाणीपुरवठा योजनांना राज्य शासनाचे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत निधी मंजूर होण्यासाठी पाणीपुरवठा मंत्री पाटील यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार पाटण तालुक्यातील २८ नळ पाणीपुरवठा योजनांच्या कामांना १४ कोटी ८९ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पाटण तालुक्यातील पेठशिवापूर, गव्हाणवाडी, मस्करवाडी, उधवणे, जिंती, शितपवाडी, मुठ्ठलवाडी, चौगुलेवाडी, कोळगेवाडी या गावांमध्ये राज्य शासनाच्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत नळ पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्या होत्या.

परंतु, जलजीवन मिशन योजनेअंतर्गत घरोघरी नळ जोडणीचे कामाचा समावेश आहे. त्यामुळे कामांचे बजेट वाढले आहे. जादा निधी आवश्यकता लक्षात घेऊन राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतून मंजूर कामे रद्द करून या योजनांचा समावेश जलजीवन मिशन योजनेअंतर्गत करून नव्याने मंजुरी देण्याचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना मंत्री देसाई यांनी केल्या होत्या. त्यानुसार पाटण तालुक्यातील राष्ट्रीय पेयजल योजनेतील कामांचा नव्याने जलजीवन मिशन योजनेअंतर्गत समावेश करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

Bombay High Court : पोटगीची मागणी म्हणजे खंडणीच, उच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी, नेमकं काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

SCROLL FOR NEXT