Water Supply sakal
सातारा

Water Supply : सातारकरांसाठी खुशखबर! पाणीकपात मागे; पाणीसाठ्यांतील वाढीनंतर निर्णय

सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास आणि उरमोडी येथील पाणीसाठा तीव्र उन्हामुळे खालावल्‍याने पालिकेने या दोन्‍ही योजनांवरील पाणीपुरवठ्यात कपात केली होती.

सकाळ वृत्तसेवा

सातारा - सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास आणि उरमोडी येथील पाणीसाठा तीव्र उन्हामुळे खालावल्‍याने पालिकेने या दोन्‍ही योजनांवरील पाणीपुरवठ्यात कपात केली होती. सुमारे दोन महिन्‍यांहून अधिक काळ ही कपात साताऱ्यात सुरू होती. गेल्‍या काही दिवसांपासून शहरासह परिसरात आणि कास तलाव तसेच उरमोडी धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे.

या पावसामुळे येथील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. पावसामुळे वाढलेल्‍या पाणीसाठ्याचा अंदाज घेत पालिकेच्‍या पाणीपुरवठा विभागाने शहरातील कपात मागे घेण्‍याचा निर्णय घेतला. यानुसार गेल्या दोन दिवसांपासून अनौपचारिकपणे शहरातील सर्व साठवण टाक्‍यांमधून पूर्वीसारखाच सर्व प्रभागांना नेहमी इतका पाणीपुरवठा सुरू झाला आहे.

तरीही पाणी जपून वापरा

सद्य:स्‍थितीत पाणीकपात मागे घेतली असली तरी आगामी काळातील पाऊसमान अनियमित आणि खंडित स्वरूपाचे राहील, असे संकेत आहेत. यामुळे नागरीकांनी आगामी काळातील पाऊसमानाचा अंदाज घेत सध्‍या मिळणाऱ्या पाण्‍याचा वापर काटकसरीने करणे आवश्‍‍यक आहे. पालिकेने दोन्‍ही योजनांच्‍या पाणीसाठ्यांचा अंदाज घेत कपात मागे घेतली आहे. याबाबतची औपचारिक घोषणा पुढील आठवड्यात होणार आहे.

कासने ओलांडला ६१ फुटांचा टप्पा

कासमधील पाणीसाठ्याने ६१ फुटांची पातळी ओलांडली आहे. यामुळे त्‍याठिकाणच्‍या सांडव्यावरून पाणी ओसंडून वाहात आहे. ओसांडणाऱ्या पाण्‍यामुळे उरमोडीतील पाणीसाठ्यात वाढ होण्‍यास मदत झाली आहे. कास परिसरात पावसाचा जोर कायम असल्‍याने आगामी काळात उरमोडीतील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होण्‍याची शक्‍यता आहे.

उरमोडीत २.५६ टीएमसी पाणी

काससह परळी खोऱ्यातही मुसळधार पाऊस सुरू असल्‍याने उरमोडीतील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. शुक्रवारी सकाळी सात वाजेपर्यंत येथे २.५६ टीएमसी इतका पाणीसाठा झाला होता. गेल्यावर्षी याच तारखेला ३.५९ टीएमसी इतका पाणीसाठा होता. गेल्यावर्षीच्‍या तुलनेत सद्य:स्‍थितीत उरमोडीतील पाणीसाठा कमी असला तरी तो समाधानकारक आहे.

अशी होती स्थिती...

1) दोन महिन्‍यांहून अधिक काळ पाणीकपात

2) पाणी योजना, टाक्‍यांनुसार कपातीचे वेळापत्रक

3) कपातीमुळे पाणीसाठा नियंत्रित करण्‍यास मदत

4) सोमवार (ता. १५) पासून कपात अनौपचारिक मागे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khadakwasala Dam : खडकवासला धरणसाखळीत जूनमध्ये पावसाची शंभरी

मुंबईत संततधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक उशिराने; अनेक भाग जलमय, ४ दिवस ऑरेंज अलर्ट

Kolhapur Bus Accident : काळीज पिळवटणारी घटना! कुटुंबाला दवाखान्यात घेऊन जाणाऱ्या शासकीय लिपिकाचा अपघातात दुर्दैवी अंत; पत्नी गंभीर जखमी, चिमुरडी आयसीयूमध्ये!

Maharashtra 21 District Rain Alert : महाराष्ट्रातील २१ जिल्ह्यात पावसाचा अलर्ट; गोवा, कारवारमध्ये मोठे ढग दाटले; पुढच्या ३ दिवसांचा हवामान अंदाज

Latest Marathi News Live Update : पुढील 4 दिवस मुंबईत मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT