Satara Tourism esakal
सातारा

साताऱ्यातील धबधबे, पर्यटनस्थळे पाहण्यासाठी जात असाल, तर थांबा! जिल्हाधिकाऱ्यांनी दिलाय महत्त्वाचा आदेश

हवामान विभागाने सातारा आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

सकाळ डिजिटल टीम

सातारा जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळे पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी तात्पुरते बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

सातारा : भारतीय हवामान खात्याने (Meteorology Department) दिलेल्या पूर्वसूचनेनुसार, दिनांक 25 ते 30 जुलै अखेर सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीचा रेड व ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आलेला आहे. सातारा जिल्ह्यात सद्यस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत आहे. हवामान विभागाने सातारा आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर (Mahabaleshwar) तालुक्यातील लिंगमळा व भिलार धबधबा, तसेच सर्व पर्यटनाचे पॉइंट, पाटण तालुक्यातील ओझर्ड (नवजा) व सडावाघापूर धबधबा (Sadawaghapur Waterfall), सातारा तालुक्यातील ठोसेघर, केळवली, वजराई-भांबवली धबधबे व कास तलाव, जावली तालुक्यातील ऐकीव या धबधब्यांच्या ठिकाणी विशेषतः मान्सून कालावधीत वर्षाविहारासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात.

सदर ठिकाणी कोणतीही अनुचित घटना घडू नये व जीवित व वित्तहानी होऊ नये, या करिता सुरक्षिततेच्या कारणास्तव सातारा जिल्ह्यातील धबधबे व पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी तात्पुरत्या स्वरुपात बंद ठेवणे आवश्यक असल्याने जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सातारा जितेंद्र डुडी यांनी सातारा जिल्ह्यातील लिंगमळा व भिलार धबधबा, ओझर्डे (नवजा), सडावाघापूर धबधबा, ठोसेघर, केळवली, वजराई-भांबवली धबधबे, कास तलाव, ऐकीव ही धबधब्याची ठिकाणे आणि जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळे पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी तात्पुरते बंद करण्याचे आदेश दिले आहेत. सदर धबधब्यांच्या / पर्यटन स्थळांच्या ठिकाणी अतिवृष्टीच्या कालावधीत पर्यटकांना 28 जुलै पर्यंत जाण्यास तात्पुरत्या स्वरुपात बंदी घालण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lohagad Murder Case: ''प्रतिष्ठेसाठी सियाने केतनला ठार मारण्याचा प्लॅन केला'', पोलिस चौकशीत चेतनचा धक्कादायक दावा

Rishabh Pant: 'भाई, कन्फर्म! मी परत येतोय...' DC सोबतच्या ट्रेडनंतर रिषभचा फोन अक्षर पटेलने आधी उचलाच नव्हता अन् मग...

Government Recruitment: मोठी बातमी! आरोग्य विभागात लवकरच पदभरती; पदनिर्मितीचा जीआर निघाला, राज्यात एवढ्या जागा रिक्त

Pune City Yellow Alert : पुणे शहराला ‘यलो’ तर घाटमाथ्याला ‘ऑरेंज’ अलर्ट; पुढील तीन दिवसात पावसाचा जोर वाढणार

Latest Marathi News Live Update: नसरापूर अत्याचार प्रकरणाचा उद्या निकाल

SCROLL FOR NEXT