सातारा

ऊस वाहतूकदाराची साडेचार लाखांची फसवणूक; मायलेकावर गुन्हा दाखल

इम्रान शेख

रहिमतपूर (जि. सातारा) : ऊसतोडणी मुकादम मायलेकाने कोरेगाव तालुक्‍यातील वाठार येथील एका ऊस वाहतूकदाराला ऊसतोडणीसाठी मजूर देतो, असे सांगून 4.65 लाखांची फसवणूक केली आहे. याबाबत रहिमतपूर पोलिस ठाण्यात अलका कांबळे व गजानन कांबळे या दोन्ही मायलेकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबतची माहिती अशी, की कोरेगाव तालुक्‍यातील वाठार किरोली येथील हणमंत पंढरीनाथ चव्हाण (वय 60) हे शेतकरी असून, ऊस वाहतूकही करतात. कारखान्याचा गळित हंगाम सुरू झाल्यानंतर त्यांना वाशिम जिल्ह्यातील सावरगाव (जिरे) येथील गजानन बबन कांबळे, अलका बबन कांबळे या ऊसतोडणी मायलेकाने तुम्हाला ऊसतोडणीसाठी मजूर देतो, असे सांगून हणमंत यांच्या मुलाकडून रिसोड आणि रहिमतपूर येथे वेळोवेळी 4.65 लाख रुपये उचल घेतली. 

हा संपूर्ण प्रकार ता. 27 ऑगस्ट 2020 ते ता. 28 सप्टेंबर 2020 या कालावधीत घडला आहे. दरम्यान, कांबळे मायलेकाने चव्हाण यांना ऊसतोडणीसाठी मजूरही पुरवले नाहीत आणि पैसेही परत केले नाहीत. त्यामुळे ते पैसे परत करावेत म्हणून चव्हाण यांच्याकडून कांबळे याच्याकडे सतत मागणी सुरू होती. मात्र, ते परत करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे हणमंत चव्हाण यांनी या दोघांविरोधात शनिवारी सायंकाळी दहा वाजता रहिमतपूर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक प्रमोद सावंत करत आहेत.

घ्यायला गेले राष्ट्रवादींतर्गत गटबाजीचा फायदा; स्वकीयांनीच दाखविला कात्रजचा घाट

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidarbha Heatwave : विदर्भात उष्णतेची लाट कायम; बुधवारी सर्वाधिक तापमान चंद्रपुरात; अकोला, अमरावती किती?

बांगलादेशचा शकिब अल हसन मुंबईत आला; T20 World Cup मधून माघार घेणाऱ्या सरकारच्या निर्णयावर संतापला, म्हणाला...

शाळांना विद्यार्थ्यांच्या रिझल्टची घाई, मुंबईतील अनेक शाळांचे निकाल जाहीर, गुणपत्रिकाचेही वाटप; शिक्षण विभागाचे नियोजन फेल?

Karnataka Congress Crisis : कर्नाटकच्या राजकारणात मोठा भूकंप! 15 मे रोजी डी. के. शिवकुमार घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ? आमदाराच्या दाव्याने खळबळ

Latest Marathi News Live Update: बंगळुरूत 'बोरिंग आणि लेडी कर्झन हॉस्पिटल'जवळ मोठी दुर्घटना, मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत

SCROLL FOR NEXT