weather update Heavy rains in Mahabaleshwar Venna lake overflowed satara SAKAL
सातारा

महाबळेश्वरात जोरदार पाऊस, वेण्णा तलाव तुडूंब भरला

महाबळेश्वरची जीवनवाहिनी असलेला वेण्णा तलाव आज मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने तुडुंब भरला

अभिजीत खुरासणे

महाबळेश्वर : महाबळेश्वरची जीवनवाहिनी असलेला वेण्णा तलाव आज मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने तुडुंब भरला. गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाने महाबळेश्वरची जीवनवाहिनी असलेला वेण्णा तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून शनिवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास सांडव्यावरून पाणी वाहू लागले. महाबळेश्वर शहर व परिसरात गेल्या आठ दिवसांपासून जोरदार पाऊस बरसत आहे. शनिवारी सकाळी ८:३० वाजेपर्यंत १३५५.४० मि. मी ५३ इंच पावसाची नोंद झाली तर, २४ तासात १५० मि.मी (५ इंच) पावसाची नोंद करण्यात आली. महाबळेश्वर शहर व परिसरात जुलै महिन्याच्या प्रारंभीपासूनच पावसाने अक्षरशः झोडपून काढले.

गेल्या आठ ते दहा दिवसांपासून महाबळेश्वर तालुक्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसाने तमाम महाबळेश्वर - पांचगणीकरांची तहान भागविणारा वेण्णा तलाव तुडुंब भरला आहे. शनिवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास वेण्णालेक सांडव्यावरून पाणी वाहू लागले याच वेण्णालेक मधून महाबळेश्वर व पांचगणी या दोन्ही पर्यटनस्थळांना पाणी पुरवठा केला जातो. वेण्णा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने समाधान व्यक्त होत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाने महाबळेश्वरची जिवनवाहिनी असलेला वेण्णा तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून शनिवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास सांडव्यावरून पाणी वाहू लागले.

महाबळेश्वर शहर व परिसरात जुलै महिन्याच्या प्रारंभीपासूनच पावसाने अक्षरशः झोडपून काढले गेल्या आठ ते दहा दिवसांपासून महाबळेश्वर तालुक्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसाने तमाम महाबळेश्वर - पांचगणीकरांची तहान भागविणारा वेण्णा तलाव तुडुंब भरला असून शनिवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास वेण्णालेक सांडव्यावरून पाणी वाहू लागले याच वेण्णालेक मधून महाबळेश्वर व पांचगणी या दोन्ही पर्यटनस्थळांना पाणी पुरवठा केला जातो वेण्णा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने समाधान व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray and Uddhav Thackeray: राज-उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र मैदानात; ४ ऑक्टोबरला मुंबईत मोर्चा, हातात फक्त तिरंगा!

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ट्रॅफिक जाम! टेम्पो पलटी झाल्याने वाहनांच्या रांगाच रांगा, 4-5 तासांपासून भीषण कोंडी

Revanth Reddy Remarks : ‘महादेव गरिबांचे, राम श्रीमंतांचे’ रेवंत रेड्डींच्या वक्तव्याने राजकीय वातावरण तापले; भाजप आक्रमक

Marathi News Live Updates: अंगारकी चतुर्थीनिमित्त मोरगावच्या मयुरेश्वराच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची मोठी गर्दी, मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण

World Heart Day 2026: कार्डिओफोबिया म्हणजे काय? लक्षणे, कारणे आणि उपचार याबद्दल संपूर्ण माहिती एकाच क्लिकवर!

SCROLL FOR NEXT