सातारा

घटस्फोटासाठी पतीला दमदाटीप्रकरणी साताऱ्यात पत्नीसह पोलिसावर गुन्हा

प्रवीण जाधव

सातारा : घटस्फोटासाठी एका पतीला दमदाटी केल्याप्रकरणी पोलिस पत्नीसह एका पोलिसावर शहर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. दीपक चिंतामण चौधरी (रा. गोळीबार मैदान) यांनी याबाबत तक्रार दिली आहे.

त्यानुसार महिला पोलिस असलेली पत्नी मनीषा दीपक चौधरी व हवालदार जगदीश कोंकणी (दोघे रा. गोळीबार मैदान) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. उपनिरीक्षक रोकडे चौकशी करत आहेत. 

मारामारीप्रकरणी संशयिताला अटक 

सातारा :
मारामारीच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगाराला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली आहे. विजय ऊर्फ पिल्या राजू नलवडे (रा. मंगळवार पेठ) असे त्याचे नाव आहे. 
डिसेंबर 2020 मध्ये त्याने साथीदारांसह एका घरामध्ये घुसून त्यास शिवीगाळ दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी देत पट्ट्याने मारहाण करून जखमी केले होते. याप्रकरणी वैभव जयराम कदम (रा. मंगळवार पेठ) याने फिर्याद दिली होती. गुन्हा घडल्यापासून विजय लपून राहात असल्याने पोलिसांना मिळून येत नव्हता.

गुन्हे प्रकटीकरण शाखेला गस्त घालत असताना तो राजवाडा परिसरात आला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्याला अटक करण्यात आली. त्याच्यावर यापूर्वी दरोडा, जबरी चोरी, गर्दी-मारामारी, दहशत करून गंभीर दुखापत करणे, शासकीय कामात अडथळा आणणे, जमावबंदी आदेशाचा भंग करणे अशाप्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

Video पाहा : Remdesivir चा साठा वाढविण्यासाठी नियोजन सुरू; इंजेक्शनच्या वापराबाबत वैद्यकीय अधिका-यांनी ठरवावे

या कारवाईत पोलिस निरीक्षक संजय पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे हवालदार हसन तडवी, अमित माने, स्वप्नील कुंभार, मोहन पवार, पंकज मोहिते, ओमकार यादव सहभागी होते. 

मटकाप्रकरणी एकावर कारवाई 

सातारा : भूविकास बॅंक चौकात मटका घेतल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे. इनायत मोहंमदअली शेख (रा. गुरुवार पेठ) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा सुमारे एक हजार 165 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Ship Toll Plan: होर्मुज स्ट्रेटमध्ये नवा ट्रॅफिक सिस्टम लागू करणार! इराणचा मोठा निर्णय; संपूर्ण प्लॅनच सांगितला

PBKS vs RCB, Playing XI: बंगळुरूने पंजाबविरुद्धच्या सामन्यासाठी अचानक कर्णधार बदलला, खरं कारण काय?

वयाच्या ४६व्या वर्षीही मुक्ता बर्वे अविवाहित का आहे? 'या' व्यक्तीवर होता क्रश, म्हणाली, 'एखाद्याच्या आयुष्यात...

LPG ग्राहकांना मोठा दिलासा! २० हजार टन एलपीजी घेऊन जहाज भारतात दाखल, गॅस पुरवठ्याचं टेन्शन कमी होणार

'तुला मुलीच होतात, मुलगा नाही...'; म्हणत पतीनं पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड टाकलं; पुण्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT