सातारा

हॅलाे! मी बॅंकेतून बाेलताेय असे सांगणा-याने करंजेतील महिलेस लाख रुपयांना फसविले

सकाळ वृत्तसेवा

सातारा : ऍक्‍सेस बॅंकेतून बोलत असल्याचे सांगून क्रेडिट कार्डचे लिमिट वाढवण्याच्या बहाण्याने येथील एका महिलेची एक लाख 7 हजार 353 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अनोळखी व्यक्तीवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत तृप्ती प्रसन्न साळुंखे (रा. करंजे, सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. 15 मार्चला एका अनोळखी व्यक्तीने त्यांच्या मोबाईलवर फोन केला होता. ऍक्‍सिस बॅंकेतून बोलत असल्याचे सांगून साळुंखे यांना त्याने क्रेडिट कार्डचे लिमिट वाढविण्यासाठी, तसेच साडेनऊ हजार रुपयांचे गिफ्ट देण्यासाठी फोन केल्याचे सांगितले. 

त्यावर विश्‍वास ठेवत तृप्ती यांनी त्यांच्या क्रेडिट कार्डच्या नंबरचे शेवटचे चार अंक त्याला सांगितले. त्यानंतर त्यांच्या मोबाइलवर आलेला ओटीपी नंबरही समोरील व्यक्तीने विचारून घेतला. त्यानंतर त्याने क्रेडिट कार्डवरून त्याने 15 ते 18 मार्च या कालावधीत तीन वेळा एक लाख 7 हजार 353 रुपये त्याच्या बॅंक खात्यावर वर्ग करून फसवणूक केल्याचे तृप्ती यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस निरीक्षक संजय पतंगे तपास करत आहेत. 

शिवेंद्रसिंहराजेंच्या शब्दास मान; नगराध्यक्षांचा राजीनामा 

बलात्कारप्रकरणी एकावर गुन्हा 

सातारा : फोटो व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी, तसेच खंडणी मागितल्याप्रकरणी एकावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सोमनाथ शिवाजी भारती (वय 27, रा. बावधन, ता. वाई) असे त्याचे नाव आहे. 

पीडित महिला व संशयिताची ओळख झाली होती. त्यानंतर त्याने संबंधित महिलेला संबंधाचे फोटो दाखवून ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. त्या फोटोच्या आधारे त्याने वारंवार तिच्यावर बलात्कार केला. ऑक्‍टोबर 2019 ते जानेवारी 2021 या कालावधीमध्ये हा प्रकार घडला आहे. त्यानंतर फोटो व्हायरल करण्याची व पतीला दाखवण्याची धमकी देत व फोटो डिलिट करण्यासाठी एटीएमवरून चार हजार 800 व गुगल पेवरून 15 हजार 500 रुपये घेतल्याचे संबंधित महिलेने फिर्यादीत म्हटले आहे.

ऑनलाइन परीक्षेस कोरोना संसर्गाचा प्रश्न येतोच कुठे? शिवाजी विद्यापीठाचे विद्यार्थी संतप्त 

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain Alert : मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढचे पाच दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; ठाणे अन् पालघरलाही सतर्कतेचा इशारा

INDW vs AUSW Live: स्मृती मानधना-शफाली वर्मा यांचा वर्ल्ड रेकॉर्ड! हरमनप्रीत कौरच्या अर्धशतकामुळे ऑस्ट्रेलियासमोर तगडे लक्ष्य

IND vs IRE 2nd T20I : संजू ०, अभिषेक ०... भारतीय संघ संकटात; गोंधळामुळे इशान किशन रन आऊट... JAI MOONDRA पुन्हा चमकला

Vilas Ghule : विलास घुले खून प्रकरणात नवे वळण; दहावा आरोपी लातूरमधून ताब्यात, गुन्ह्यातील स्कॉर्पिओ जप्त

Breaking : बेन स्टोक्सचा धक्कादायक निर्णय! इंग्लंडच्या कर्णधाराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जाहीर केली निवृत्ती

SCROLL FOR NEXT