सातारा

जागतिक टपाल दिन : काळाच्या ओघात पोस्टमनदादा हरवले!

मुकंद भट

ओगलेवाडी (जि. सातारा) ः नव्या इंटरनेटच्या युगात जलद दळणवळणाच्या मोबाईल, व्हॉट्‌सऍप, ईमेल आदींचा वापर सर्रास होत आहे. त्यामुळे अनेक लोकांना अनेक वर्षे घरपोच सेवा देणाऱ्या आणि केवळ अवघ्या 50 पैशांत देशाच्या कानाकोपऱ्यात जाणारे पोस्टकार्ड सध्या दुर्मिळ झाले आहे. तसेच लोकांना पत्र देऊन त्यांच्या सुख-दुःखात समरस होणारा व आपुलकीच्या सेवेतून घरोघरी जिव्हाळ्याचे संबंध ठेवणारा व अतूट नाती जपणारा पोस्टमनही काळाच्या ओघात हरवत चालला आहे, ही खंत आहे.

नऊ ऑक्‍टोबर हा जागतिक टपाल दिन आहे. बदलत्या काळात दळणवळणाच्या मोबाईल व व्हॉट्‌सऍप, इलेक्‍ट्रॉनिक मेल साधनांचा लोकांच्यात वापर वाढू लागला आहे. नव्या पिढीवर त्यांचा प्रभाव व आकर्षण वाढले आहे. जग सर्वांच्या जवळ येऊ लागले आहे. कमी वेळेत व अल्प खर्चात दूरवर जगभरात लोकांशी त्वरित संपर्क साधला जात आहे. तसेच व्हिडिओमुळे प्रियजन भेटल्याचा आनंदही मिळू लागला आहे. पूर्वी पत्रलेखनाच्या सवयीने हस्ताक्षर सुधारले जात असे, लेखनात वेगळा आनंदही मिळत असे. पत्राच्या सुरुवातीचा "सप्रेम नमस्कार, विनंती विशेष' पत्राच्या शेवटी असलेला "तब्येत सांभाळावी, खुशाली कळवावी' आदी मजकूर आता लोप पावले आहेत. युद्धभूमीवर अहोरात्र लढणाऱ्या लष्करातील शूरवीर जवानांना त्यांच्या गावाकडे घरच्या लोकांनी पत्राद्वारे मनोधैर्य वाढवून साथ दिलेली आहे. पोस्टातील आर्थिक गुंतवणूक सुरक्षित व विश्वासार्ह आजही मानली जाते.

जागतिक टपाल दिन : 45 हजार पालकांनी मुलींचे भविष्य केले सुरक्षित!

कोरोना संसर्गामुळे बचत व्यवहार करणे जिकिरीचे झाले आहे. त्यावर उपाय म्हणून भारतीय डाक विभागाने बचत खात्यामार्फत इंटरनेट बॅंकिंग, मोबाईल बॅंकिंग सेवाही उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे ग्राहकांना घरबसल्या बॅंकिंग व्यवहार करणे शक्‍य झाले आहे. कोरोनाच्या अडचणीच्या काळात डाक खात्याने औषधे पोचवण्याची सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. मात्र, आता इंटरनेटच्या काळातही पोस्टल सेवा स्वस्त साधन म्हणून राहिलेले आहे.

लॉकडाउनमध्ये पोस्टमनचे पुनरागमन;आजारी व्यक्ती,ज्येष्ठ नागरिकांसाठी ठरले देवदूत

Edited By : Siddharth Latkar 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT