सातारा : दंगा करू नका, असे सांगितल्याच्या रागातून प्रतापसिंहनगर येथील एकावर तलवार हल्ला केल्याप्रकरणी दोघांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. प्रमोद ऊर्फ बाळा काशिनाथ सगट व यलाप्पा काशिनाथ सगट (दोघे रा. प्रतापसिंहनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. भारत गंगाराम कांबळे यांच्या फिर्यादीनुसार त्यांच्यावर शहर पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे.
कांबळे व संशयित सोमवारी (ता. 22) सायंकाळी सातच्या सुमारास प्रतापसिंहनगर येथे थांबले होते. या वेळी संशयितांनी विनाकारण दंगा करायला सुरुवात केली. दंगा करू नका, असे कांबळे यांनी त्यांना सांगितले. त्यावर त्यांच्यात वाद झाला. त्यातून संशयितांनी कांबळे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
त्यानंतर मी इथला डॉन आहे, तुला सोडत नाही असे म्हणत बाळा सगट याने त्यांच्या डोक्यात तलावारीने वार केला. सहायक पोलिस निरीक्षक चेतन मछले तपास करत आहेत.
Video पाहा : आता काेल्हापूर, सांगलीही गृहराज्यमंत्र्यांचे टार्गेट
Edited By : Siddharth Latkar
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.