Satara Municipality
Satara Municipality  sakal
सातारा

सातारा पालिकेची वसुली करण्‍यात प्रशासनास अपशय

सकाळ वृत्तसेवा

सातारा : येथील पालिकेची वसुली करण्‍यात प्रशासनास अपशय आल्‍याने त्‍याचा परिणाम शहरातील विकासकामांवर झाला आहे. शहरात झालेल्‍या कामांची बिले मिळण्‍यास ठेकेदार पालिका प्रशासनाकडे हेलपाटे मारत आहेत. तरीही बिले मिळत नसल्‍याने ठेकेदारांत नाराजी असू्न परिणामी त्‍याचा फटका विविध ठेकेदारांकडे कामास असणाऱ्या कंत्राटी कामगारांना बसत आहे.

कोरोना, लॉकडाउनमुळे सर्व अर्थचक्र ठप्‍प झाले होते. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्‍यानंतर पालिकेने शहरातील मिळकतधारकांकडून येणारी बाकी वसूल करण्‍याची मोहीम हाती घेतली. पहिल्‍या टप्‍प्‍यात वसुली होत नसल्‍याचे लक्षात आल्‍यानंतर मुख्‍याधिकारी अभिजित बापट यांनी त्‍याचा आढावा घेण्‍यास सुरुवात केली. यानंतर त्‍यांनी तीन पथके स्थापन करत थकीत सुमारे ४२ कोटींच्‍या वसुलीवर भर दिला. त्‍यांनी भर, लक्ष देवूनही सुमारे १६ कोटींच्‍या पुढे वसुली करण्‍यात पथकांना यश आले नाही. थकबाकी असणारी मोठी रक्कम तिजोरीबाहेर राहिल्‍याने खजिन्‍यात खडखडाट निर्माण होवून त्‍याचा परिणाम शहरातील कामांवर झाला.

शहरातील विविध भागांत कामे पूर्ण केलेल्‍या कामांची बिले मिळावीत, यासाठी गेल्‍या काही दिवसांपासून ठेकेदारांची पालिकेच्‍या वित्तलेखा विभागात चकरा सुरू आहेत. हेलपाटे मारूनही बिले मिळत नसल्‍याने ठेकेदारांत नाराजी आहे. शासनाकडून उपलब्‍ध होणारा निधी, होणाऱ्या वसुलीचा ताळमेळ घालत गेल्या काही दिवसांपासून

तीन वेळा आंदोलने

घंटागाडीवर काम करणाऱ्यांना शासनाच्‍या नियमानुसार सर्व सुविधा देण्‍याचे बंधन ठेकेदारावर आहे. या सेवांमध्‍ये कुचराई झाल्‍यानंतरही गेले अनेक दिवस ते काम करणाऱ्या ठेकेदारांची पाठराखण पालिका प्रशासनाने केल्‍याचे दिसून आले आहे. यामुळे त्‍यावर काम करणाऱ्यांनी गेल्‍या वर्षभरात तीन वेळा आंदोलने केली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Google Layoffs : गुगलमधील कर्मचारी कपात सुरूच.. कोअर टीममधून 200 जणांना नारळ! भारत-मेक्सिकोमध्ये देणार संधी

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

CSK vs PBKS : 'सेल्फिश' धोनी! शेवटच्या ओव्हरमधील ड्राम्यानंतर थाला होतोय ट्रोल, Video Viral

Share Market Today: शेअर बाजार उघडताच 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

SCROLL FOR NEXT