Affordable Inverter Bulb
Affordable Inverter Bulb esakal
विज्ञान-तंत्र

Affordable Inverter Bulb : हे 4 इन्व्हर्टर बल्ब वाचवतील तुमचे पैसे

सकाळ डिजिटल टीम

Affordable Inverter Bulb : आता देशभरात उन्हाळा सुरू झाला असून त्यामुळे घरोघरी वीज वापरण्याचं प्रमाणही खूप वाढलं आहे. वीज वापरण्याचं प्रमाण वाढल्याने उन्हाळ्यात वीजपुरवठा खंडित होण्याचं म्हणजेच लोडशेडिंगचं प्रमाणही अधिक होतं. कधी रात्री तर कधी दिवसा वीजपुरवठा खंडित होत असतो. सतत लाईट गेल्यामुळे मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो.

आता तुमच्या इथेही असंच लाईट जाण्याचं प्रमाण जास्त असेल आणि तुम्हाला रात्रीच्या वेळेसही बिना लाईट गेलेली असतानाही उजेड हवा असेल तर इन्व्हर्टर बल्ब तुमच्यासाठी बेस्ट पर्याय आहेत.

या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला अशाच काही एलईडी बल्बबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये इन-बिल्ट बॅटरी आहे. त्यामुळे वीज चालू असताना हे बल्ब चार्ज होतात आणि वीज गेल्यावर आपोआप चालू होतात. विशेष म्हणजे या बल्बचा बॅटरी बॅकअप 3-5 तासांपर्यंत असतो आणि त्यांची बॅटरी लाईफ सुमारे 4 वर्षे असते.

फिलिप्स 12W एलईडी

या यादीतील पहिला बल्ब म्हणजे प्रसिद्ध फिलिप्स कंपनीचा Philips 12W LED. याची किंमत ५४९ रुपये आहे. तुम्ही Amazon वरून देखील सोप्या पद्धतीनं ऑर्डर करू शकता. हा बल्ब इतरांपेक्षा काहीसा महाग आहे, त्यामुळे त्याच्यासोबत एक वर्षाची वॉरंटी देखील उपलब्ध आहे. यात 2200mAH ची बॅटरी असून ४ तासांचा बॅकअप आहे. उच्च व्होल्टेजमुळेही या बल्बला धोका नाही.

हॅलोनिक्स 12W लाइट बल्ब

हॅनोनिक्सच्या या बल्बची किंमत ४८० रुपये आहे. यासोबतच ६ महिन्यांची वॉरंटीही मिळते. यात 2600mAh बॅटरी आहे जी आपोआप चार्ज होते. पॉवर कट केल्यानंतर, हा बल्ब ४ तासांपर्यंत आरामात बॅकअप देतो. आपण ते कोणत्याही दुकानातून किंवा ऑनलाइन स्टोअरमधून खरेदी करू शकता.

बजाज 9W B22 LED

तुम्ही Amazon वरून Bajaj 9W B22 LED ५९९ रुपयांच्य किमतीत खरेदी करू शकता. यासोबतच एक वर्षाची वॉरंटीही मिळणार आहे. याचा बॅटरी बॅकअपही ४ तासांचा आहे. याच्याच तोडीचा एक बल्ब म्हणजे wipro 15W B22 जो ३८७ रुपयांना उपलब्द आहे. त्याचा बॅटरी बॅकअप देखील ४ तासांचा आहे.

हॅवेल्स LHLDEGEDML8O012 12W

तुम्ही हे हॅवेल्स इन्व्हर्टर बल्ब फ्लिपकार्टवरून ४८९ मध्ये खरेदी करू शकता. यासोबत एक वर्षाची वॉरंटीही मिळेल आणि त्याचा बॅकअपही ४ तासांचा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Modi Rally: "मोदीजी आता कांद्यावर बोला" मोदींनी भाषण मध्येच थांबवलं! पिंपळगाव बसवंतच्या सभेत काय घडलं?

PM Modi Nashik: नाशिकमध्ये पंतप्रधान अखेर कांद्यावर बोललेच; ऑपेरेशन ग्रीन, निर्यात बंदी आणि बफर स्टॉकबाबत म्हणाले...

Mumbai Metro: पंतप्रधान मोदींच्या रोड शोसाठी मुंबईत मेट्रो बंद; सुरक्षेचे कारण देत घेतला निर्णय

Latest Marathi News Live Update: अयोध्येत भव्य राम मंदिर उभारण्याचे बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते -पंतप्रधान मोदी

India Head Coach : टीम इंडियाच्या मुख्य कोच निवडीबाबत मोठी अपडेट; राहुल द्रविडनंतर 'या' दिग्गज खेळाडूने अर्ज भरण्यास दिला नकार

SCROLL FOR NEXT