Air Tag Ipad Pro
Air Tag Ipad Pro Sakal
विज्ञान-तंत्र

‘एअर टॅग’, ‘आयपॅड प्रो’ बाजारात

वृत्तसंस्था

वॉशिंग्टन - जगप्रसिद्ध ॲपल कंपनीने काल (ता. २०) रात्री त्यांच्या ‘स्प्रिंग लोडेड’ इव्हेंटमध्ये अनेक नवीन किंवा सुधारित उत्पादने जाहीर केली. लाइव्ह स्ट्रिमिंग झालेल्या या कार्यक्रमात ‘ॲपल’ने ‘आयपॅड प्रो २०२१’, ‘आयमॅक’, ‘ॲपल टीव्ही’ आणि ‘एअर टॅग’ यांच्यासह अन्य काही उत्पादने लाँच केली गेली.

‘ॲपल’च्या संकेतस्थळावरून आणि युट्यूब वाहिनीवरुन हा कार्यक्रम प्रक्षेपित करण्यात आला. गेल्या वर्षी ‘ॲपल’ कंपनीने गेल्या वर्षांत 274.5 अब्ज डॉलरची उत्पादने विकली. मॅक आणि आयपॅड उत्पादनांनीच कंपनीला 52.3 अब्ज डॉलर मिळवून दिले होते. काल ‘ॲपल’ कंपनीने मिनी डिस्प्ले आणि एम-१ चिप असलेला आयपॅड प्रो बाजारात आणला. ‘ॲपल टीव्ही’मध्येही सुधारणा करत अधिक वेगवान प्रोसेसर चिप बसविली आहे. वस्तू हरवू नये म्हणून ‘ॲपल’ने ‘एअर टॅग’ हे नवीन उत्पादन बाजारात आणले आहे. तसेच, ‘स्पोटीफाय’ला टक्कर देण्यासाठी पॉडकास्ट सेवाही सुरु केली आहे. अधिक स्लिम असलेला ‘आयमॅक’ही कंपनीने बाजारात आणला आहे. ‘आयफोन’धारकांना ज्याची अपेक्षा होती, त्या ‘आयओएस १४.५’साठी मात्र त्यांना आणखी काही काळ वाट पहावी लागणार आहे.

ही आहेत नवी उत्पादने

आयफोन १२ : पर्पल रंगामध्ये. हा रंग केवळ याच प्रकारात उपलब्ध (भारतातील किंमत ७९,९०० रुपये)

आयमॅक : नवीन डिझाईन. सात नवीन रंगात उपलब्ध. एम-१ चिपसेट, अधिक स्लिम, २४ इंची रेटिना आय डिस्प्ले, १०८० पिक्सल फेसटाइम एचडी कॅमेरा (भारतातील किंमत १,१९,९०० रुपये)

आयपॅड प्रो : एम-१ चिपसेट, ५० टक्के कार्यक्षमता वाढविली (भारतातील किंमत ९९,९०० रुपये)

ॲपल टीव्ही ४ के : ए-१२ बायोनियक चिप, सिरी व्हॉइट कमांड सपोर्ट (भारतातील किंमत १८,९०० रुपये)

एअर टॅग : नवीन ट्रॅकिंग गॅझेट. (भारतातील किंमत ३,१९० रुपये)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT