Rufus AI Shopping Assistant Launched on Amazon India esakal
विज्ञान-तंत्र

Amazon Rufus Shopping Assistant : ॲमेझॉनमध्ये आला तुमचा पर्सनल AI असिस्टंट; शॉपिंगला बनवणार एकदम खास,कसं वापराल Rufus? एकदा बघाच

Amazon's Rufus AI Shopping Assistant Debuts in India : ॲमेझॉनने त्यांचा कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित शॉपिंग असिस्टंट "रुफस" (Rufus) भारतात लॉंच केला आहे.

Saisimran Ghashi

Amazon Rufus AI Assistant Feature : शॉपिंग लवर्ससाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. भारतातील ऑनलाइन शॉपिंग आता अधिक सोयीस्कर आणि स्मार्ट बनणार आहे. ॲमेझॉनने त्यांचा कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित शॉपिंग असिस्टंट "रुफस" (Rufus) भारतात आणलेले आहे. सध्या तो निवडक ग्राहकांसाठीच उपलब्ध आहे, पण लवकरच सर्व ग्राहकांना वापरता येणार आहे.

रुफस तुमच्या खरेदीमध्ये कशी मदत करतो?

महत्वाची माहिती मिळवणे: तुम्ही कोणत्याही उत्पादनाबद्दल प्रश्न विचाराल तर रुफस तुम्हाला अमेझॉनच्या माहितीनुसार उत्तरे देईल. इतकेच नाही तर इंटरनेटवरूनही माहिती गोळा करून तुमच्या शंकांचे निरसन करेल.

उत्कृष्ट वस्तूंची निवड: तुम्ही कोणत्याही वस्तूची खरेदी करण्याचा विचार करत असाल तर रुफस तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय निवडण्यास मदत करतो. वेगवेगळ्या उत्पादनांची तुलना करून तो तुम्हाला योग्य वस्तूची निवड करण्यासाठी मार्गदर्शन करतो.

स्मार्ट गिफ्ट्स: कोणत्याही प्रसंगासाठी किंवा एखाद्या व्यक्तीसाठी भेटवस्तू निवडणे कठीण असते. अश्यावेळी रुफस तुमच्या कामी येईल. तो तुमच्या आवडीनुसार आणि प्रसंगानुसार भेटवस्तू सुचवून तुमची मदत करेल.

आतापर्यंत अमेरिकेत चाचणीच्या स्वरुपात उपलब्ध असलेला रुफस आता भारतात आला आहे. तो अजूनही विकासाच्या प्रारंभिक टप्प्यात असल्यामुळे काही चुका होऊ शकतात. तुम्हाला अशी एखादी चूक आढळल्यास तुम्ही थम्स अप किंवा थम्स डाउन देऊन फीडबॅक देऊ शकता. तुमचा हा फीडबॅक रुफसला अधिक चांगले आणि अचूक बनवण्यासाठी उपयुक्त ठरेल.

रुफस हे नाव एकदम खास आहे. ॲमेझॉनमध्ये कर्मचाऱ्यांना त्यांचे पाळीव प्राणी कार्यालयात आणण्याची परवानगी आहे. रुफस हे ॲमेझॉनच्या सुरुवातीच्या काळात कंपनीच्या ऑफिसमध्ये सर्वाधिक दिसून येणार्‍या पहिल्या कुत्र्यापैकी एकाचे नाव होते. त्यामुळेच हा सर्वोत्तम शॉपिंग असिस्टंटसाठी हे नाव अगदी योग्य आहे.

वेळ न घालवता ॲमेझॉन अॅप अपडेट करा आणि तुमच्या पुढच्या खरेदीमध्ये रुफसचा स्मार्ट सहाय्यक म्हणून वापर करुन बघा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Crime: होमगार्ड तरुणीचा खून मैत्रिणीकडून,मृतदेह फेकण्यासाठी घेतली मुलाची मदत

अग्रलेख : जुगाराचे उलटे दान

Chh. Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरात गणेश मंडळाच्या मंडप उभारणीच्या वादातून तुफान हाणामारी; तिघा भावांकडून हल्ला, एकाचा मृत्यू

आजचे राशिभविष्य - 23 ऑगस्ट 2025

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २३ ऑगस्ट २०२५ ते २९ ऑगस्ट २०२५ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT