Antarctica Penguin eSakal
विज्ञान-तंत्र

Antarctica Penguin : ग्लोबल वॉर्मिंगमुळे नष्ट होतायत अंटार्क्टिकावरील पेंग्विन; बर्फ वितळल्यामुळे लाखो नवजात पेंग्विन्सचा मृत्यू

हे पेंग्विन समुद्राच्या कडेला तयार झालेल्या बर्फात आपली अंडी देतात. यावेळी जर हा कडेचा बर्फ तुटला किंवा वितळला, तर ती अंडी किंवा नवजात पेंग्विन समुद्रात पडतात आणि मरुन जातात.

Sudesh

Antarctica Emperor Penguins : अंटार्क्टिकावरील प्रसिद्ध प्राणी म्हणजे एम्पेरर पेंग्विन. या संपूर्ण खंडावर त्यांचंच राज्य चालतं. मात्र याच पेंग्विन्सची संख्या आता अगदी कमी होत चालल्याचं समोर आलं आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे याठिकाणचा बर्फ मोठ्या प्रमाणात वितळतोय, आणि त्यामुळेच पेंग्विन्स ब्रीडिंग करू शकत नसल्याचं ब्रिटिश अंटार्क्टिक सर्वेक्षणात स्पष्ट झालं आहे.

हे सर्वेक्षण करणाऱ्या वैज्ञानिकांपैकी एक पीटर फ्रेटवेल यांनी सांगितलं, की एम्पेरर पेंग्विन ही जगातील सगळ्यात मोठी पेंग्विन प्रजाती आहे. हे पेंग्विन केवळ अंटार्क्टिकामध्ये आढळतात. हे पेंग्विन समुद्राच्या कडेला तयार झालेल्या बर्फात आपली अंडी देतात. यावेळी जर हा कडेचा बर्फ तुटला किंवा वितळला, तर ती अंडी किंवा नवजात पेंग्विन समुद्रात पडतात आणि मरुन जातात. आज तकने याबाबतचं वृत्त प्रसिद्द केलं आहे.

2023 साली याठिकाणी कमी बर्फामुळे सुमारे 14 पेंग्विन कॉलनीज ब्रीडिंग करू शकल्या नाहीत. ग्लोबल वॉर्मिंगमुळे ग्लेशियरच्या कडेचा बर्फ मोठ्या प्रमाणात वितळला आणि लाखो अंडी व नवजात पेंग्विनचा समुद्रात पडून मृत्यू झाला. गेल्या सात वर्षांपासून दरवर्षी हे प्रमाण वाढत चालल्याचंही या सर्वेक्षणात म्हटलं आहे.

2022 साली ग्लोबल वॉर्मिंगमुळे सुमारे 6 कॉलनीजना ब्रीडिंग करता आलं नव्हतं. एकाच वर्षात ही संख्या 14 वर गेली आहे. याच वेगाने बर्फ वितळत राहिला, तर या शतकाअखेर अंटार्क्टिकावरील 99 टक्के पेंग्विन्स नष्ट होतील अशी भीती पीटर यांनी व्यक्त केली. दुर्दैव म्हणजे, या सगळ्याला मानवच कारणीभूत असेल, असंही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT