Apps Sakal
विज्ञान-तंत्र

Best Apps: TikTok-Instagram ला मागे टाकत 'हे' ठरले वर्षातील सर्वोत्तम अ‍ॅप, फीचर्स आहेत खास

Apple ने वर्ष २०२२ मधील सर्वात लोकप्रिय अ‍ॅपची घोषणा केली आहे. BeReal हे वर्षातील सर्वोत्तम अ‍ॅप ठरले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Apple Apps Of the year: Apple ने App Store अ‍ॅवॉर्ड विनर्सची घोषणा केली आहे. यासोबतच, सर्वाधिक डाउनलोड करण्यात आलेल्या अ‍ॅप्स आणि गेम्सबाबत देखील माहिती दिली आहे. फ्री आणि पेड दोन्ही कॅटगरीमध्ये या अ‍ॅप्सची माहिती देण्यात आली आहे. हा अ‍ॅवॉर्ड कंपनीचे सर्व प्लॅटफॉर्म iPhone, iPad, Apple Watch, Mac आणि Apple TV च्या अ‍ॅप्ससाठी देण्यात आला आहे.

वर्ष २०२२ मध्ये सोशल नेटवर्क अ‍ॅप BeReal हे आयफोन अ‍ॅप ऑफर द ईयर ठरले आहे. तर नोट करण्यासाठी उपयोगी येणारे GoodNotes 5 हे सर्वोत्तम आयपॅड अ‍ॅप ठरले आहे. Mac साठी Synium Software GmbH’s MacFamilyTree 10 हे सर्वोत्तम अ‍ॅप ठरले आहे.

हे ही वाचा : दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ...

TelevisaUnivision Interactive च्या Vix स्ट्रीमिंग सर्व्हिसला यावर्षाचे सर्वोत्तम Apple TV अ‍ॅप म्हणून घोषित करण्यात आले आहे. व्यायामासाठी उपयोगी येणारे Gentler Streak हे वर्षातील सर्वोत्तम Apple Watch अ‍ॅप ठरले आहे.

अ‍ॅपलनुसार, Electronic Arts चे Apex Legends Mobile हे टॉप आयफोन अ‍ॅप ठरले आहे. तर X.D. Network Inc. च्या Moncage ला टॉप आयपॅड गेम घोषित केले आहे. इतर अ‍ॅप्सबद्दल सांगायचे तर Apple TV साठी HandyGames च्या El Hijo आणि Mac साठी Devolver Inscryption ला बेस्ट गेम म्हणून जाहीर करण्यात आले आहे.

BeReal अ‍ॅपची होत आहे चर्चा

सर्वाधिक चर्चा BeReal अ‍ॅपची होत आहे. टिकटॉक आणि इंस्टाग्रामकडून जोरदार टक्कर मिळत असतानाही BeReal हे सर्वोत्तम सोशल मीडिया अ‍ॅप ठरले आहे. फ्रान्स येथील कंपनीने वर्ष २०२२ मध्ये या अ‍ॅपला लाँच केले होते. फ्रंट आणि बॅक कॅमेऱ्याने काढलेले फोटो पोस्ट करताना अनेकदा अलर्ट पाठवण्याचे फीचर यात देण्यात आले याची लोकप्रियता वाढली होती. बेस्ट अ‍ॅप्स आणि गेम्ससोबतच अ‍ॅपल अ‍ॅप स्टोरच्या एडिटर्सने ५ कल्चरल इम्पॅक्ट विनर्सची देखील माहिती दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या भावात घसरण; आठवड्याच्या पहिल्या दिवशी काय आहे 24 कॅरेट सोन्याचा भाव?

Kolhapur Crime: 'कुरुंदवाडात धारदार शस्त्राने युवकावर सपासप वार'; एकमेकाकडे खुन्नसपणे बघण्याच्या रागातून झाला वाद

Trimbakeshwar : पहिने धबधब्याला पर्यटकांची गर्दी; नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर तुफान कोंडी

Latest Maharashtra News Updates : मरकटवाडीच्या ग्रामस्थांचं विधानभवन बाहेर आंदोलन

Nagpur Crime : निर्माल्य विसर्जनानंतर पतीसोबत काढला 'सेल्फी' अन् महिलेने नदीत मारली उडी; दोघांत असं काय घडलं?

SCROLL FOR NEXT