Apple Foldable Device eSakal
विज्ञान-तंत्र

Apple Foldable Device : 'फोल्डेबल' मार्केटमध्ये येण्याची तयारी करतंय अ‍ॅपल; नव्या रुपात येणार आयफोन किंवा आयपॅड - रिपोर्ट

Foldable iPhone : सध्या कित्येक मोबाईल कंपन्या आपले फोल्डेबल स्मार्टफोन लाँच करत आहेत. सॅमसंग, मोटोरोला, वनप्लस, व्हिवो अशा कंपन्यांनी यात बाजी मारली असली, तरी अद्याप आयफोन या बाबतीत मागे राहिला होता.

Sudesh

Apple Foldable iPhone : सध्या कित्येक मोबाईल कंपन्या आपले फोल्डेबल स्मार्टफोन लाँच करत आहेत. सॅमसंग, मोटोरोला, वनप्लस, व्हिवो अशा कंपन्यांनी यात बाजी मारली असली, तरी अद्याप आयफोन या बाबतीत मागे राहिला होता. मात्र आता लवकरच आयफोन किंवा आयपॅडचं फोल्डेबल व्हर्जन समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

2026 किंवा 2027 साली अ‍ॅपल आपलं फोल्डेबल डिव्हाईस लाँच करेल. मॅकरुमर्सच्या हवाल्याने दि एल्क या कोरियन वेबसाईटने याबाबत माहिती दिली आहे. या डिव्हाईसचा डिस्प्ले 7 ते 8 इंच मोठा असण्याची शक्यता आहे. सध्या सॅमसंगच्या Galaxy Z Fold 5 या फोल्डेबल स्मार्टफोनचा डिस्प्ले 7.6 इंच मोठा आहे. अ‍ॅपलचं डिव्हाईस याला थेट टक्कर देईल.

तज्ज्ञांनी असा अंदाज व्यक्त केला आहे, की अ‍ॅपलच्या या डिव्हाईसचं डिझाईन बुक-स्टाईल असणार आहे. झी फोल्ड 5 या स्मार्टफोनचं डिझाईन देखील असंच आहे. झी फ्लिपप्रमाणे छोटा स्मार्टफोन अ‍ॅपलने बनवण्याची शक्यता कमी आहे, असंही तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

आयपॅड मिनी होणार रिप्लेस?

हे डिव्हाईस आयफोनचं व्हर्जन असेल, की आयपॅडचं व्हर्जन असेल याबाबत अजूनही साशंकता आहे. मात्र, मीडिया रिपोर्टनुसार हे नवीन डिव्हाईस आयपॅड मिनीला रिप्लेस करण्याची शक्यता आहे. (Apple Foldable iPad)

अर्थात, दुसरीकडे आयपॅड मिनीच्या नवीन व्हर्जनवर कंपनी काम करत असल्याची चर्चाही इंडस्ट्रीमध्ये सुरू आहे. यामध्ये OLED स्क्रीनचा वापर करण्यात येईल असं म्हटलं जात आहे. यामुळे फोल्डेबल अ‍ॅपल डिव्हाईस येण्याची शक्यता आणखी धूसर वाटत आहे. मात्र, स्पर्धेमध्ये टिकायचं असल्यास अ‍ॅपलला स्वतःमध्ये बदल करणंही गरजेचं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Small Savings Schemes: PPF आणि पोस्ट ऑफिस FD गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! पुढील 3 महिन्यांसाठी व्याजदर जाहीर; पाहा नवे दर

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : पालघरच्या बोईसर तारापूर एमआयडीसीतील केमिकल कारखान्यात भीषण स्फोट; २ किमी परिसर हादरला

कमळीचे रिअर लाईफ वडिल पाहिलेत का? लेक दिसते सेम टू सेम आई सारखी, वडिलांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रम एकत्र पोहचलं कुटुंब

विजयला रोखण्यासाठी स्टालिन यांचा होता 'भाजप'वाला प्लॅन, 'शत्रू'सोबत हातमिळवणीची दिलेली ऑफर; मोठ्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

SCROLL FOR NEXT