pegasus case 29 phones examined malware in 5 but no conclusive proof that it had the spyware says supreme court  esakal
विज्ञान-तंत्र

Mercenary Spyware: आयफोन युजर्स सावधान! पेगासिस सारखा आला नवा स्पायवेअर; अ‍ॅपलनं काय म्हटलंय वाचा?

आयफोन बनवणाऱ्या अॅपल या स्मार्टफोन कंपनीनं ९१ देशांमधील आपल्या सर्व युजर्सना इशारा देणारं नोटिफिकेशन पाठवलं आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : आयफोन बनवणाऱ्या अॅपल या स्मार्टफोन कंपनीनं ९१ देशांमधील आपल्या सर्व युजर्सना इशारा देणारं नोटिफिकेशन पाठवलं आहे. यामध्ये भारतातील युजर्सचाही समावेश आहे. या नोटिफिकेशनमध्ये पेगासिस प्रमाणं हेरगिरी करणाऱ्या स्पायवेअरसारखं एका नव्या मर्सनरी स्पायवेअरचा युजर्सना धोका असल्याचं म्हटलं आहे. (Apple warns users in 91 countries, including India of Pegasus like mercenary spyware attacks)

भारतातील आयफोन युजर्सनाही हे नोटिफिकेशन आलं असून या नोटिफिकेशनमध्ये कंपनीनं मोबाईलच्या मालकांना इशारा दिला आहे. या इशाऱ्यानुसार, नव्या मर्सनरी स्पायवेअरमध्ये डेटा चोरण्याची क्षमता असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळं युजर्सची प्रायव्हसी आणि डेटा सुरक्षेला धोका असल्याचं यात म्हटलं आहे. (Latest Marathi News)

ऑक्टोबर २०२३ मध्ये अॅपलनं आपल्या युजर्सना अशाच प्रकारचं नोटिफिकेशन पाठवलं होतं. यामध्ये देशातील अनेक राजकीय नेत्यांना हे नोटिफिकेशन आलं होतं, यामध्ये काँग्रेसचे वरिष्ठ खासदार शशी थरुर, आम आदमी पार्टीचे खासदार राघव चढ्ढा आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्या आयफोनवरही हे नोटिफिकेशन आलं होतं. त्यावेळच्या नोटिफिकेशनमध्ये सरकार पुरस्कृत सायबर हल्ल्याचा इशारा देण्यात आला होता.

दरम्यान, इस्रायलची कंपनी NSO ग्रुपनं डेव्हलप केलेल्या पेगासिस सॉफ्टवेअरकडून कथितरित्या होत असलेल्या अनधिकृत हेरगिरीच्या आरोपांबाबत सन २०२१ मध्ये सुप्रीम कोर्टानं एका टेक्निकल कमिटीची स्थापना केली होती. या कमिटीला पेगासिसबाबतच्या आरोपांबाबत चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले होते. (Marathi Tajya Batmya)

त्यानंतर ऑगस्ट २०२२ मध्ये या कमिटीनं आपला अहवाल दिला होता की, २९ आयफोन तपासण्यात आले आहेत. यामध्ये स्पायवेअर आढळलेलं नाही. पण यांपैकी पाच आयफोनमध्ये मालवेअर हा व्हायरल आढळून आला आहे. (Latest Maharashtra News)

दरम्यान, अॅपलनं नमूद केलं की नागरी समाज संस्था, तंत्रज्ञान कंपन्या आणि पत्रकारांच्या सार्वजनिक अहवाल आणि संशोधनानुसार, काही अपवादात्मक परिस्थितीत देशातील सरकारनं खाजगी कंपन्याकडून भाडेतत्वावर स्पायवेअर विकसित करतात जसं इस्रायलच्या NSO ग्रुपनं पेगासस नावाचं स्पायवेअर तयार केलं आहे. ज्याचा वापर अनेक देशांमध्ये करण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

Katraj Issues : सोपानकाकानगरमध्ये नागरी सुविधांचा अभाव, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी; तीन वर्षांपासून करत भरुनही महापालिकेचे दुर्लक्ष

Agriculture News : ऊस पिकावर हुमणीच्या प्रादुर्भावाचा धोका; कृषी विभागातर्फे प्रभावी उपाययोजना करण्याचे आवाहन

Women Empowerment: घरच नव्हे, गावही चालविणार! छप्पन्न गावांत लवकरच महिलाराज, १११ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर

IND vs ENG 2nd Test: हॅरी ब्रूकने 'खांद्या'ने वाचवली स्वतःची विकेट! लढवली अक्कल, पण झाला असता त्याचाच गेम; रिषभ पंत भडकला

SCROLL FOR NEXT