aadhar card link to voter id
aadhar card link to voter id sakal
विज्ञान-तंत्र

सरकारकडून नवी तरतूद, वर्षातून चार वेळा मतदार नोंदणी करता येणार

सकाळ डिजिटल टीम

केंद्र सरकारने मतदार यादीशी आधार लिंक करण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. याबाबत सरकारने शुक्रवारी चार अधिसूचना जारी केल्या आहेत. यामध्ये मतदार यादीशी आधार लिंक करणे, सेवा मतदारांसाठी मतदार यादी लिंग-सुसंगत करणे याशिवाय तरुण मतदारांना वर्षातून एक ऐवजी चार वेळा मतदार यादीत नाव नोंदवण्याची संधी मिळणे, इत्यादी तरतुदींचा समावेश आहे.

संसदेने पारित केलेल्या निवडणूक दुरुस्ती कायदा-2021 अंतर्गत ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी ट्विट द्वारे माहिती दिली.

याबाबत माहिती देताना किरेन रिजिजू ट्वीट करत म्हणाले , "निवडणूक आयोगाशी चर्चा केल्यानंतर या संदर्भात चार अधिसूचना जारी करण्यात आल्या आहेत. आता 1 जानेवारी किंवा 1 एप्रिल किंवा 1 जुलै किंवा 1 ऑक्टोबर रोजी 18 वर्षे पूर्ण होणारे तरुण मतदार यादीत आपलं नाव नोंदवण्यासाठी तत्काळ अर्ज करू शकतात."

केंद्रीय मंत्र्यांनी एक तक्ताही शेअर केला आहे, ज्यामध्ये नमूद केले आहे की, "यामुळे एकाच व्यक्तीला एकाहून अधिक ठिकाणी मतदार यादीत नाव नोंदवण्यापासून रोखले जाईल."

तसेच निवडणूक आयोग आता निवडणूक संबंधित साहित्य ठेवण्यासाठी आणि सुरक्षा दल व निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी कोणत्याही इमारतीची मागणी करण्याची शक्यता आहे. या अधिसुचना लवकरात लवकर अमलात आणल्या तर तरुणांना वर्षातून चार वेळा नाव नोंदणी करणे, सोपी जाणार.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election : प्रचाराचे वादळ थंडावले ; सातव्या टप्प्यासाठी उद्या मतदान

Kalyani Nagar Accident :भ्रष्ट चेल्यांनी बदलले तिघांचे रक्तनमुने ; ‘ससून’मधील डॉक्टरांची बनवाबनवी

Pune Accident : पुण्यात पुन्हा रॅश ड्रायव्हिंग ; बीआरटी मार्गात घुसवली मोटार

World No Tobacco Day 2024 : हृदय-फुफ्फुसांपासून ते कर्करोगापर्यंत, धूम्रपानामुळे ‘या’ गंभीर आजारांना मिळतेय आमंत्रण

World No Tobacco Day 2024: ‘तंबाखू’वर मात शक्य! हवा फक्त दृढनिश्चय; ‘आरोग्य’ विभागाकडून 2 वर्षात दीड लाखावर समुपदेशन

SCROLL FOR NEXT