Online Gaming Asus ROG eSakal
विज्ञान-तंत्र

Online Gaming : 12GB रॅम अन् 6000 mAh बॅटरी.. आसुसच्या तगड्या गेमिंग स्मार्टफोनवर मिळतेय तब्बल 30 हजारांची सूट!

Gaming Smartphone Offer : आसुस कंपनीची आरओजी सीरीज ही गेमिंगसाठी एक उत्तम स्मार्टफोन सीरिज आहे.

Sudesh

Best Gaming Smartphone Discount : स्मार्टफोन गेमिंग म्हटलं की जगभरातील गेमर्सच्या डोळ्यापुढे एकच नाव येतं, ते म्हणजे - आसुस. आसुस कंपनीची आरओजी सीरीज ही गेमिंगसाठी एक उत्तम स्मार्टफोन सीरिज आहे. यातील Asus ROG Phone 6 या स्मार्टफोनवर तब्बल 30 हजार रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे.

विशेष म्हणजे, भारतीय यूजर्सना देखील या डिस्काउंटचा लाभ घेता येणार आहे. तसंच, यासाठी कोणत्याही प्रकारच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्ड ऑफरची गरज भासणार नाही. आसुस कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर ही ऑफर सुरू आहे.

ROG Phone 6 या स्मार्टफोनची मूळ किंमत 77,999 रुपये आहे. हा फोन आता केवळ 47,999 रुपयांना उपलब्ध झाला आहे. वेबसाईट व्यतिरिक्त ROG स्टोअर आणि विजय सेल्समधून देखील तुम्ही हा स्मार्टफोन खरेदी करू शकता. Vijay Sales मध्ये या फोनवर 3,999 रुपये प्रति महिना असा नो कॉस्ट ईएमआय ऑप्शनही उपलब्ध आहे. (Gaming News)

फीचर्स

आसुस आरओजी 6 या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8+ Gen 1 चिपसेट देण्यात आली आहे. यामध्ये 6.78 इंच AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 165Hz एवढा आहे. याची पीक ब्राईटनेस 1,200 निट्स एवढी आहे.

या फोनमध्ये 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज देण्यात आलेलं आहे. तसंच यात 50MP मुख्य कॅमेरा, 13MP अल्ट्रावाईड कॅमेरा, 5MP मॅक्रो कॅमेरा आणि 12MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 6000 mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 65W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT