E-Peek pahani sakal
विज्ञान-तंत्र

E-Peek Pahani : खरिपातील ई-पीक पाहणी ६९ टक्के; यापुढील पाहणी तलाठीस्तरावर होणार

E-peek pahani latest news | शेतकरी खातेदारांची एकूण संख्या ६० हजार ३४८ आहे. यानुसार अंतिम पीक पेरणी क्षेत्र व ई-पीक पाहणी क्षेत्रामध्ये २४ हजार ४८७ हेक्टरचा फरक आहे.

सकाळ वृत्तसेवा

किनवट : तालुक्यातील यंदाच्या खरीप हंगामात गत २३ सप्टेंबरपर्यंत ३६ हजार ५७३ शेतकरी खातेदारांनी एकूण ५४ हजार ५९० हेक्टर क्षेत्रातील ई-पीक पेरा पाहणी केली. त्याची टक्केवारी ६९ आहे. यापुढील ई-पीक पाहणी तलाठीस्तरावर करण्यात येणार असल्याची माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली.

तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र १ लाख ५५ हजार ४३५ हेक्टर आहे. खरीप हंगामासाठीचे सर्वसाधारण क्षेत्र ७८ हजार १ हेक्टर आहे. महसूल विभागाच्या नोंदीनुसार यंदाच्या खरीप हंगामात तालुक्यातील ९ महसूल मंडळातील १७१ गावामध्ये ७९ हजार ७७ हेक्टरवर पीक पेरणी झालेली आहे.

शेतकरी खातेदारांची एकूण संख्या ६० हजार ३४८ आहे. यानुसार अंतिम पीक पेरणी क्षेत्र व ई-पीक पाहणी क्षेत्रामध्ये २४ हजार ४८७ हेक्टरचा फरक आहे. मुदत संपल्यामुळे २३ हजार ७७५ शेतकरी खातेदारांची वैयक्तिकरित्या ई-पीक पाहणी करणे राहून गेले आहे.

केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पेरलेल्या पिकांचा पेरा ई-पीक पाहणी अ‍ॅपवर नोंदविणे आवश्यक आहे. यंदा तालुक्यात पावसाच्या आगमनानुसार झालेल्या पेरण्या जुलैच्या तिसरा आठवड्यापर्यंत रखडल्या होत्या.

त्यामुळे ई-पीक पेरा नोंदणीस उशिरा झाला. ई-पीक अ‍ॅपच्या वापराबाबत कृषी, महसूल, ग्रामविकास विभागाने पुरेशी जागृती करूनसुद्धा अनेक शेतकऱ्यांना ई-पीक पाहणीचे महत्त्व अजूनही समजलेले नाही. खरीप हंगाम २०२४-२५ मधील पीक पाहणी नोंदवण्यासाठी महसूल विभागाने १ ऑगस्टपासून सुरवात केली होती.

परंतु, सततच्या वीजपुरवठा खंडित होण्यासह इतर तांत्रिक अडचणी, शासकीय सुट्ट्या, अवकाळी पाऊस अशा विविध कारणांमुळे बहुसंख्य शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करता आली नाही. त्यातच १५ सप्टेंबर ई-पीक पाहणी करण्याची शेवटची तारीख होती.

ई-पीक पाहणी गेली राहून

३१ टक्के पेरणी क्षेत्राची ई-पीक पाहणी राहून गेली आहे. ज्या २३ हजार ७७५ शेतकऱ्यांनी पेरलेल्या पिकांची नोंद मोबाईल अ‍ॅपद्वारे ई-पीक पाहणीमध्ये केलेली नाही, त्यांना नुकसान भरपाई मदत व किमान आधारभूत किंमतीनुसार खरेदीचा लाभ मिळविणे अवघड जाणार आहे.

२३ ऑक्टोबरपर्यंत पाहणी

शासनाने या पुढील पीक पाहणीची मुदतवाढ तलाठीस्तरावर देण्याचा निर्णय घेतला आहे. आता तलाठी स्तरावरील ई-पीक पाहणी तपासणीची मुदतवाढ केली आहे. आता २४ सप्टेंबर ते २३ ऑक्टोबर या कालावधीत सहाय्यक आणि तलाठी पीक पाहणी करू शकतील.

विशेष मोहीम राबविली

अनेक भागातील शेतामध्ये इंटरनेट मिळत नव्हते. सर्व्हर डाउन असल्यामुळे ई-पीक पाहणी प्रक्रियेत गतीमानता नव्हती. तसेच ई-पीक पाहणीबाबत बरेच शेतकरी उदासीन आहेत. जिल्हा प्रशासनाकडून प्रत्येक गावातील २०० शेतकऱ्यांची ई-पीक नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ठेवून विशेष मोहीम राबविली गेली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Alert: वडीवळे धरण ९० टक्के भरलं; मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू; इंद्रायणी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Mumbai Rain: मुंबईला रेड अलर्ट! कर्मचाऱ्यांनो 'वर्क फ्रॉम होम' करा, बाहेर पडू नका; BMCकडून आवाहन

Latest Marathi News Live Update : पुणे-मुंबई दरम्यानची एसटी वाहतूक पुढील आदेश येईपर्यंत बंद राहणार

Alandi Flood Update : आषाढी वारीपूर्वी आळंदीत पूरस्थिती, 'इंद्रायणी'ला महापूर, घाटांसह धर्मशाळा बुडाल्या; देवस्थान-पोलिसांकडून वारकऱ्यांना कडक सूचना

Asia Cup 2027 Dates: आशिया चषकाच्या तारखा समोर आल्या! भारताच्या विरोधानंतरही बांगलादेशात होणार स्पर्धा

SCROLL FOR NEXT