cammon 20 passwords that can easily hacked esakal
विज्ञान-तंत्र

Strong Passwords : मोबाईल अन् लॅपटॉपसाठी चुकनही वापरू नका 'या' 20 पैकी एकही पासवर्ड, नाहीतर हॅक होणारच!

Weak password risk : आम्ही तुम्हाला 20 अशा पासवर्डची यादी दिली आहे, जे हॅक करणे सोपे असतात आणि आपण ते वापरत असाल तर ताबडतोब बदलावे. डिजिटल सुरक्षा राखण्यासाठी या पासवर्ड्सपासून दूर राहा.

Saisimran Ghashi

आजच्या डिजिटल युगात स्मार्टफोन, लॅपटॉप, आणि टॅब्लेट आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत. शिक्षण, ऑनलाइन खरेदी, बँकिंग, आणि करमणुकीसाठी या उपकरणांवर अवलंबून राहणे सोपे झाले आहे. मात्र, यामुळे सायबर गुन्हेगारी आणि ऑनलाइन फसवणुकीचे प्रमाण देखील वाढले आहे. याच पार्श्वभूमीवर, तुमचा पासवर्ड किती सुरक्षित आहे, याकडे लक्ष देणे अत्यावश्यक झाले आहे.

20 सर्वात असुरक्षित पासवर्ड

1. 123456

2. password

3. lemonfish

4. 111111

5. 12345

6. 12345678

7. 123456789

8. admin

9. abcd1234

10. 1qaz@WSX

11. qwerty

12. admin123

13. Admin@123

14. 1234567

15. 123123

16. Welcome

17. abc123

18. 1234567890

19. india123

20. Password

सायबर सुरक्षा तज्ज्ञांचा इशारा

2025 ची सुरुवात होताच सायबर सुरक्षा तज्ज्ञांनी सर्व मोबाइल आणि लॅपटॉप वापरकर्त्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. सामान्यतः वापरण्यात येणारे पासवर्ड हे हॅकर्ससाठी सोपे लक्ष्य ठरतात. अशा कमजोर पासवर्डमुळे तुमची वैयक्तिक माहिती चोरी होऊ शकते, तसेच आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता असते.

सुप्रसिद्ध सायबर सुरक्षा फर्म NordPass ने नुकताच एक अहवाल जाहीर केला, ज्यामध्ये सायबर गुन्ह्यांमध्ये वापरले जाणारे 20 सर्वात कमजोर पासवर्ड उघड झाले आहेत. या अहवालात 2.5TB डेटा, ज्यामध्ये मालवेअर आणि डेटा ब्रीचमधून चोरीला गेलेले पासवर्ड समाविष्ट आहेत, त्याचा अभ्यास करण्यात आला. या पासवर्डची हॅकर्सकडून काही सेकंदांतच हॅकिंग होऊ शकते, असे स्पष्ट झाले आहे.

पासवर्ड सुरक्षित ठेवण्यासाठी टिप्स

जर तुमचा पासवर्ड या यादीत असला तर तो त्वरित बदलणे गरजेचे आहे. सुरक्षित पासवर्ड तयार करताना पुढील गोष्टींचा विचार करा.

1. किमान 10 कॅरेक्टरचा पासवर्ड ठेवा.

2. पासवर्डमध्ये विशेष चिन्हे, आकडे, तसेच लहान आणि मोठ्या अक्षरांचा समावेश करा.

3. नाव, जन्मतारीख किंवा सहज ओळखता येईल अशी माहिती पासवर्डमध्ये टाळा.

सायबर फसवणुकीपासून बचाव करण्यासाठी सुरक्षित पासवर्डचा वापर हा पहिला टप्पा आहे. योग्य खबरदारी घेतल्यास तुमची वैयक्तिक आणि आर्थिक माहिती सुरक्षित ठेवता येईल. त्यामुळे, आता तुमचा पासवर्ड तपासा आणि तुमची डिजिटल सुरक्षा सुनिश्चित करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT