Bengaluru Cab Driver App
Bengaluru Cab Driver App eSakal
विज्ञान-तंत्र

Bengaluru Cab Driver : ओला-उबरला टक्कर देण्यासाठी तयार केलं स्वतःचं अ‍ॅप; बंगळुरूमधील कॅब चालकाचा स्टार्टअप व्हायरल

Sudesh

Bengaluru Cab Driver starts own App : बंगळुरूला भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणतात. तेथे असलेल्या टेक इंडस्ट्रीमुळे शहराला हे नाव पडलं आहे. बंगळुरूतील लोकही आता प्रचंड प्रमाणात टेक सॅव्ही झाले आहेत. याचाच प्रत्यय तेथील एका कॅब चालकाला पाहून येतो. या रिक्षा चालकाने ओला आणि उबरला टक्कर देण्यासाठी चक्क स्वतःचंच अ‍ॅप तयार केलं आहे.

नॅनो ट्रॅव्हल्स

लोकेश असं या कॅब ड्रायव्हरचं (Bengaluru Cab Driver) नाव आहे. त्याने नॅनो ट्रॅव्हल्स नावाचं स्वतःचं अ‍ॅप तयार केलं आहे. विशेष म्हणजे, या अ‍ॅपच्या मार्केटिंगसाठी लोकेश कसलाही खर्च करत नाही. लोकेश सध्या स्वतः एक उबर टॅक्सी (Uber Taxi) चालवतो, आणि यामध्ये बसलेल्या पॅसेंजर्सना तो आपल्या अ‍ॅपची माहिती देतो.

दि बंगळुरू मॅन (The Bengaluru Man) नावाच्या एक्स हँडलवरून याबाबत पोस्ट करण्यात आली आहे. यामध्ये दिलेल्या माहितीनुसार, लोकेशने ओला आणि उबरला टक्कर देण्यासाठी हे अ‍ॅप सुरू केलं आहे. आतापर्यंत त्याच्या अ‍ॅपवर (Nano Travels) सुमारे 600 ड्रायव्हर जॉईनही झाले आहेत. बंगळुरूमध्ये ओला-उबर व्यतिरिक्त रॅपिडो आणि नम्मा यात्री यांसह बरेच कॅब-रिक्षा अ‍ॅप्स (Bengaluru Cab App) आहेत. एवढी शर्यत असताना त्याचं हे यश वाखाणण्याजोगं आहे.

नॅनो ट्रॅव्हल्स अ‍ॅप सध्या अँड्रॉईड आणि आयओएस अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. एक्सवर व्हायरल होत असल्यामुळे या अ‍ॅपचे डाऊनलोड वाढत चालले आहेत.

नेटिझन्सच्या प्रतिक्रिया

कित्येक एक्स यूजर्स लोकेशच्या या निर्णयाचं कौतुक करत आहेत. "हा नक्कीच बंगळुरूचाच आहे", "हीच खरी आंत्रप्रन्योरशिप, पुढील प्रवासासाठी शुभेच्छा" अशा सकारात्मक प्रतिक्रिया नेटकरी या पोस्टवर देत आहेत.

बंगळुरूचा टोनी स्टार्क

दुसऱ्या एका घटनेमध्ये बंगळुरूचा एक रिक्षा चालकही सध्या ट्रेंड होतो आहे. नम्मा यात्री रिक्षा चालवणारी ही व्यक्ती आपल्या अनोख्या क्यूआर कोडमुळे प्रसिद्ध होत आहे. साधारणपणे कोड स्कॅन करण्यासाठी मागितल्यानंतर रिक्षा चालक लॅमिनेट केलेला एखादा कागद पुढे करतात. मात्र या रिक्षा चालकाने आपल्या स्मार्टवॉचचा स्क्रीन सेव्हर म्हणूनच क्यूआर कोड सेव्ह केला आहे. याचा फोटोही सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT