Air Purifier Offers eSakal
विज्ञान-तंत्र

Air Purifier Offers : हवा प्रदूषणाचं घेऊ नका टेन्शन, या दिवाळीला खरेदी करा स्वस्तात मस्त एअर प्युरिफायर! पाहा ऑफर्स

सध्या केवळ शहरांमध्येच नाही, तर निमशहरी भागात देखील प्रदूषणाची पातळी वाढत चालली आहे.

Sudesh

गेल्या काही दिवसांमध्ये दिल्ली, मुंबई आणि देशातील इतर प्रमुख शहरांमधील हवेचं प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. केवळ शहरांमध्येच नाही, तर निमशहरी भागात देखील प्रदूषणाची पातळी वाढत चालली आहे. अशा वेळी आपल्या घरामध्ये शुद्ध हवा खेळती रहावी यासाठी कित्येक लोक एअर प्युरिफायर खरेदी करण्याला पसंती देत आहेत.

सध्या दिवाळीनिमित्त कित्येक ई-कॉमर्स वेबसाईट्स आणि दुकानांमध्ये सेल सुरू आहे. या सेलमध्ये तुम्ही अगदी पाच ते दहा हजार रुपये किंमतीमध्ये एअर प्युरिफायर खरेदी करू शकता. सॅमसंग, फिलिप्स, एमआय, केंट अशा मोठ्या कंपन्यांचे एअर प्युरिफायर या सेलमध्ये कमी किंमतीवर उपलब्ध आहेत.

फ्लिपकार्टवर सॅमसंगचा पोर्टेबल एअर प्युरिफायर केवळ 7,255 रुपयांना उपलब्ध आहे. याची मूळ किंमत 12,990 रुपये आहे. मात्र, सेलमध्ये हा स्वस्तात मिळत आहे. याला साडेचार स्टार रेटिंग मिळाली आहे. एमआय कंपनीचा स्मार्ट एअर प्युरिफायर याठिकाणी 9,999 रुपयांना उपलब्ध आहे. याला तब्बल 2,309 जणांनी रेटिंग दिलं आहे.

केंट कंपनीचा 21,990 रुपये किंमतीचा एअर प्युरिफायर फ्लिपकार्टच्या दिवाळी सेलमध्ये अवघा 8,999 रुपयांना मिळत आहे. तसंच, केंटचा एअर+यूव्ही फिल्टर 10,999 रुपयांना मिळतो आहे. याची मूळ किंमत 29,950 रुपये आहे. मात्र दिवाळी सेलमध्ये यामध्ये 63 टक्के सूट मिळत आहे. (Tech News)

अमेझॉनवर फिलिप्स कंपनीचा एअर प्युरिफायर केवळ 9,499 रुपयांना मिळत आहे. याची मूळ किंमत 12,995 रुपये आहे. मात्र, ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलमध्ये यावर 27 टक्के सूट मिळत आहे. अमेझॉन बेसिक्सचे काही छोटे एअर प्युरिफायर देखील तीन ते चार हजार रुपयांना उपलब्ध आहेत. तुमचं घर छोटं असेल, किंवा तुम्हाला एका रुमसाठी प्युरिफायर हवा असेल तर हे पर्याय देखील तुम्ही पाहू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Development Plan : गणपतीपुळेचा विकास आराखडा 7 वर्षांपासून कागदावरच! पालकमंत्री उदय सामंतांच्या बैठकीत काय निर्णय होणार?

Dhairyasheel Mane, Ashokrao Mane : खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव मानेंना पंचगंगा प्रदूषण आमंत्रणचं नाही; चिडलेले आमदार माने काय म्हणाले

Kurla News: उलट्या, जुलाब, ताप आणि चक्कर..., कुर्ल्यात मोमोज खाल्ल्यानंतर १६ जणांना विषबाधा

GATE 2027 Registration: आजपासून नोंदणी सुरू; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि परिक्षेची फी

Marathi News Live Updates : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी नेहा बोरा दाखल, विद्यार्थ्यांशी संवाद साधत जाणून घेतले प्रश्न

SCROLL FOR NEXT