विज्ञान-तंत्र

उशाखाली स्मार्टफोन ठेवून झोपता? होऊ शकतात गंभीर आजार, जाणून घ्या सविस्तर माहिती

सकाळन्यूजनेटवर्क

स्मार्टफोन आजकाल प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनला आहे. दैनंदिन त्याचा वापरही मोठ्या प्रमाणात केला जात आहे. स्मार्टफोनमुळे आयुष्यात अनेक गोष्टी सोप्याही झालेल्या आहेत. पण, जसं एखाद्या गोष्टीचा फायदा असतो तसाच तोटाही असतो. स्मार्टफोनच्या अतिरेक वापरामुळे आपल्याला अनेक अडणींना सामोरं जावं लागतं. परिणामी अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. स्मार्टफोनमधून निघणारे रेडिएशन लोकांच्या आरोग्यावर परिणाम करतात, हे अनेक संशोधनातून सिद्धही झालं आहे.  स्मार्टफोनच्या अतिरेक वापरानंतर होणाऱ्य समस्यावर अनेक  तज्ज्ञांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. त्यापैकी सर्वात महत्वाचं म्हणजो, स्मार्टफोन चुकीच्या ठिकाणी ठेवल्यानेही आपण अनेक रोगांना बळी पडू शकतो. पाहूयात अशा कोण-कोणत्या जागा आहेत जिथं स्मार्टफोन ठेवणं टाळलेच पाहिजे....

ब्रिटेनमधील एक्जिटर विद्यापीठात स्मार्टफोनच्या वापरावर संशोधन करण्यात आलं. यामध्ये बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला. स्मार्टफोनमधून निघणाऱ्या रेडिएशनमुळे कॅन्सर आणि नपुंसकतासारख्ये गंभीर आजार होऊ शकतात. अंतरराष्ट्रीय कॅन्सर रिसर्च एजन्सीने स्मार्टफोनमधून निघणाऱ्या इलेक्ट्रो मॅग्नेटिक रेडिएशनला कार्सिनोजन म्हणजेच कॅन्सर होणाऱ्या तत्वांच्या श्रेणीत टाकलं आहे. स्मार्टफोनच्या अतिवापराबाबत ICRA ने चेतावनीही दिली आहे. कान आणि डोक्यात ट्युमरसारखे आजार उद्भवू शकतात, अशी भिती आयसीआरए यांनी व्यक्त केला आहे. २०१४ मध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार,  स्मार्टफोनपासून निघणाऱ्या  इलेक्ट्रो मॅग्नेटिक किरणांचा परिणाम सरळ नपुंसकतावर पडतोय.  

पँटच्या खिशात स्मार्टफोन ठेवण्याची अनेकांना सवय असते, मात्र यामुले शुक्राणूच्या उत्पादनावर परिणाम होत असल्याचं संशोधकांनी सांगितलं आहे. तर बर्‍याच जणांना पँटच्या मागच्या खिशात मोबाईल ठेवण्याची सवय असते. वैद्यकीय तज्ञांच्या मते असे करू नये, कारण याचा पायाच्या नसावर वाईट परिणाम होतो. ज्यामुळे तुमचे पाय दुखू शकतात. तसेच फोनला मागील खिशात ठेवल्यास पाठदुखीचा त्रास देखील होऊ शकतो.

अनेकजण रात्री झोपताना स्मार्टफोन उशाखाली ठेवून झोपतात. ही चूक कधीही करू नका, कारण यामुळे स्मार्टफोनमधून उत्सर्जित होणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमुळे डोकेदुखीची समस्या उद्भवू शकते. त्यासोबत चक्कर येण्यासारखी समस्या देखील होऊ शकते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, फोनमधून निघणारे रेडिएशन मानवांसाठी अत्यंत हानिकारक आहे. २०१७ मध्ये इजरायल येथील हायफा विद्यापीठाच्या संशोधनात असं म्हटलेय की, झोपणयापूर्वी अर्धा तास आधी मोबाईलचा वापर बंद करा. संशोधकांच्या मते स्मार्टफोन, कंप्यूटर तथा टिव्हीच्या स्क्रीनमधून निघणाऱ्या निळी किरणे (‘स्लीप हार्मोन’) मेलाटोनिनच्या उत्पादनावर परिणाम करतात, यामुळे झोप न लागण्याची समस्या उद्भवू शकते. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 DC vs LSG Live Score: दिल्लीने लखनौला मात देत राखला घरचा गड अन् स्पर्धेतील आव्हानही कायम; इशांतचा भेदक मारा ठरला निर्णायक

Team India Coach: टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी CSK च्या 'गुरु'ची चर्चा! पाच वेळचा IPL विजेता कोच घेणार द्रविडची जागा?

Chhagan Bhujbal: कोसळलेल्या होर्डिंगशी ठाकरेंचा काय संबंध? भुजबळांचा सरकारला घराचा आहेर

Animals computation: यंदा बुद्ध पोर्णिमेला होणार नाही प्राणी गणना! वरिष्ठांकडून कान उघडणी; काय घडलंय नेमकं?

Ghatkopar hoarding : 'जीव वाचला पण रोजी रोटी गेली'; गंभीर जखमी झालेले टॅक्सी चालक सुभेदार मोर्या यांची व्यथा

SCROLL FOR NEXT