BSNL 5 month recharge plan 997 Rupees know details esakal
विज्ञान-तंत्र

BSNL Recharge : BSNL बंपर रिचार्ज ऑफर! महिन्याला फक्त 199 रुपयांच्या खर्चात 5 महिने फ्री कॉलिंग,रोज 2GB डेटा अन् बरंच काही

BSNL 5 month recharge plan 997 Rupees : BSNL ने नवा रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे . हा प्लॅन तब्बल 160 दिवसांची (5 महिने) वैधता देते.यामध्ये रोज 2GB डाटा,फ्री कॉलिंग,मेसेज आणि बऱ्याच सुविधा आहेत.

Saisimran Ghashi

BSNL Network : BSNL ने नवा रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे ज्याची किंमत फक्त 997 रुपयांचा आहे. हा प्लॅन तब्बल 160 दिवसांची (5 महिने) वैधता देते. याचा अर्थ तुम्हाला 5 महिन्यांसाठी रिचार्ज करण्याची झंझट नाही.

या धमाका प्लॅनमध्ये तुम्हाला रोज 2GB डाटा मिळतोय. म्हणजेच 160 दिवसांत तुम्हाला एकूण 320GB डाटा उपलब्ध होतो. इतकेच नाही तर यात दररोज 100 मोफत SMS आणि भारतातील कोणत्याही नेटवर्कवर मोफत अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग देखील समाविष्ट आहे.

फक्त कॉल आणि डाटाच नाही तर या रिचार्जमध्ये मोफत राष्ट्रीय रोमिंग आणि हार्डी गेम्स, झिंक म्युजिक आणि BSNL ट्यून सारख्या व्हॅल्यू एडेड सर्व्हिसिजंचा देखील समावेश आहे. यामुळे कनेक्टिव्हिटी आणि मनोरंजन दोन्ही गोष्टींचा आस्वाद घेण्यासाठी हा प्लॅन खूपच फायद्याचा आहे.

BSNL ची 4G आणि 5G सेवा

BSNL 15 ऑक्टोबर रोजी अधिकृतपणे आपली 4G सेवा सुरू करण्याची तयारी करत आहे. कंपनीने आत्तापर्यंत सुमारे 25,000 4G साइट्स बसवून मोठी प्रगती केली आहे. ही सेवा अनेक ठिकाणी चाचणी टप्प्यात आली आहे आणि BSNL ने ग्राहकांना 4G सिम कार्ड्स वितरण करण्यास सुरुवात केली आहे.रिपोर्टच्यानुसार, कंपनी दिल्ली आणि मुंबईमध्ये 4G सेवा सुरू करण्याची योजना आखत आहे, त्यानंतर लवकरच संपूर्ण देशात विस्तार करण्यात येणार आहे.

भविष्याच्या दृष्टीने, BSNL 5G सेवांच्या लाँचचीही तयारी करत आहे. यामुळे ग्राहकांना वेगवान कनेक्टिव्हिटी आणि चांगली सेवा गुणवत्ता मिळेल. टेलिकॉम क्षेत्रात होणारे बदलते स्वरूप पाहता BSNL या नवीन घडामोडींसह स्पर्धात्मक राहण्याचा प्रयत्न करत आहे.

BSNL चा हा नवा रु. 997 चा रिचार्ज प्लॅन दीर्घकालीन वैधता आणि खर्चिक बचत करणारा डाटा आणि कॉलिंग सेवा शोधणाऱ्या वापरकर्त्यांसाठी उत्तम पर्याय आहे. येत्या काळात येणाऱ्या 4G आणि भविष्यातील 5G सेवांसह, BSNL भारतातील प्रमुख टेलिकॉम कंपन्यांसाठी एक मजबूत पर्याय म्हणून समोर येण्याच्या तयारीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Goodluck Cafe Viral Video: पुण्यातील गुडलक कॅफेत बन मस्कामध्ये काचेचा तुकडा; खवय्यांमध्ये संताप, व्हिडिओ व्हायरल

टोमणे सहन न झाल्याने टेनिसपट्टू राधिकावर बापानेच झाडल्या गोळ्या; पोलिस तपासात धक्कादायक बाबी उघड, नेमकं काय घडलं?

PG Medical Courses: आरोग्य विद्यापीठाचे पीजी प्रवेश सुरू; तीन अभ्यासक्रमांच्या प्रवेश अर्जासाठी १३ जुलैपर्यंत मुदत

Space Technology Agriculture: स्पेस टेक्नोलॉजीमुळे शेतीत होईल क्रांती! इस्रो शिकवणार उपग्रहांचा शेतीमध्ये उपयोग, आजच करा अर्ज!

संगमनेर हादरलं! 'भूमिगत गटारात गुदमरून दोन कामगारांचा मृत्यू'; ठेकेदाराचा निष्काळजीपणा जबाबदार, नेमकं काय घडलं..

SCROLL FOR NEXT