PAN and Aadhaar Card Link
PAN and Aadhaar Card Link esakal
विज्ञान-तंत्र

पॅन-आधार लिंकची शेवटची तारीख पुढील वर्षापर्यंत वाढवली

सकाळ डिजिटल टीम

पॅन-आधार लिंकिंगची अंतिम तारीख पूर्ण एक वर्ष म्हणजे 31 मार्च 2023 पर्यंत वाढवलेली आहे.

जर तुम्ही अद्याप पॅन कार्ड (PanCard) आधारशी लिंक (Pan Card With Aadhar Card) केले नसेल. तर तुमच्याकडे आनंदी होण्याचे तसेच थोडेसे उदास होण्याचे कारण आहे. सरकारने कामाची शेवटची तारीख एक वर्षाने वाढवली आहे, मात्र आता ही सेवा 'मोफत' मिळणार नाही.

आयकर विभागासाठी धोरण ठरवणारी सर्वोच्च संस्था असलेल्या सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने ( CBDT) पॅन-आधार लिंकिंगची अंतिम तारीख पूर्ण एक वर्ष म्हणजे 31 मार्च 2023 पर्यंत वाढवलेली आहे. सीबीडीटीने ( CBDT) बुधवारी सायंकाळी उशिरा यासंदर्भात अधिसूचनाही जारी केली. करदात्यांची गैरसोय कमी करण्यासाठी आधारला पॅन कार्डशी जोडण्याचा कालावधी 31 मार्च 2023 पर्यंत वाढवण्यात आला आहे, असं या अधिसूचनेत म्हटलं आहे. पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याची शेवटची तारीख सरकारने चौथ्यांदा वाढवली आहे.

सीबीडीटीच्या या नव्या प्रणालीनंतर आतापर्यंत ज्यांचे पॅनकार्ड आधारशी लिंक करण्यात आलेले नाहीत, ते 31 मार्च 2023 पर्यंत कोणत्याही अडथळ्याविना कार्यरत राहणार आहेत. अशा प्रकारे आयकर विवरणपत्र भरण्यासाठी ते परतावा (Refund) मिळविण्यासाठी पूर्वीप्रमाणेच त्याचा वापर करता येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT