Chandrayaan 3 Photoshoot eSakal
विज्ञान-तंत्र

Chandrayaan 3 Photoshoot : 'चांद्रयान-2'ने केलं 'चांद्रयान-3'चं फोटोशूट; चंद्राच्या कक्षेतून कसं दिसतंय विक्रम लँडर?

Chandrayaan-2 Orbiter : चांद्रयान-2 मोहिमेतील लँडर हे चंद्रावर क्रॅश झालं होतं; मात्र त्याचं ऑर्बिटर अजूनही कार्यरत आहे.

Sudesh

ISRO Moon Mission : 'चांद्रयान-3'बाबत मोठी अपडेट समोर आली आहे. चंद्रावर उतरलेल्या विक्रम लँडरचे काही नवीन फोटो समोर आले आहेत. विशेष म्हणजे हे फोटो चांद्रयान-2च्या ऑर्बिटरने क्लिक केले आहेत.

चांद्रयान-2 मोहिमेतील विक्रम लँडर हे चंद्रावर क्रॅश झालं होतं; मात्र त्याचं ऑर्बिटर अजूनही कार्यरत आहे. चांद्रयान-3 हे चंद्राच्या कक्षेत पोहोचलं असताना या ऑर्बिटरने तिसऱ्या चांद्रयानाशी संपर्क देखील साधला होता. आता या ऑर्बिटरमधील कॅमेऱ्याने चांद्रयान-3 मधील लँडरचे फोटो क्लिक केले आहेत.

@Chandrayaan_3 या एक्स हँडलवरुन हे फोटो शेअर करण्यात आले आहेत. यामध्ये चंद्राच्या पृष्ठभागावर अगदी छोटसं असं विक्रम लँडर दिसत आहे. 'चांद्रयान-2'चं ऑर्बिटर हे चंद्राच्या पृष्ठभागापासून भरपूर उंचीवर आहे. यामधील ऑर्बिटर हाय रिझॉल्यूशन कॅमेऱ्याने (OHRC) हा फोटो क्लिक केला आहे

ओएचआरसी हा कॅमेरा चंद्राभोवती असणारा सर्वात हाय रिझॉल्यूशनचा कॅमेरा असल्याचं या पोस्टमध्ये म्हटलं आहे. तसंच, चांद्रयानाने 23 तारखेला लँडिंग केल्यानंतर हा फोटो क्लिक केला गेला आहे, असंही यात स्पष्ट करण्यात आलंय.

प्रज्ञान रोव्हरचा व्हिडिओही समोर

दरम्यान, इस्रोने चांद्रयान-3 चा एक नवीन व्हिडिओ आज शेअर केला. यामध्ये प्रज्ञान रोव्हर हे लँडर मॉड्यूलमधून बाहेर येताना दिसत आहे. 23 तारखेला सायंकाळी 6:04 वाजता चांद्रयान-3ने चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग केलं होतं. यानंतर काही तासांनी प्रज्ञान रोव्हर चंद्रावर उतरलं होतं.

भारताने रचला इतिहास

'चांद्रयान-3' मोहीम यशस्वीपणे फत्ते करून भारताने नवा विक्रम केला आहे. यानंतर चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा जगातील चौथा देश ठरला आहे. तर, चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ पोहोचणारा पहिलाच देश ठरण्याचा मान भारताला मिळाला आहे. यामुळे चंद्राची आतापर्यंत न मिळालेली माहिती इस्रोला मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyclone Shakti: शक्ती चक्रीवादळ कुठे पोहोचले? धोका नेमका कधी टळणार? हवामान खात्याकडून तारीख जाहीर

Ramdas kadam : रामदास कदम यांचा आणखी एक खळबळजनक दावा, थेट उद्धव ठाकरेंना आव्हान

Crime News : गोळीबार प्रकरण: पंचवटी पोलिसांकडून १४वा संशयित जेरबंद, आतापर्यंत माजी नगरसेवकासह १४ अटकेत

World Cup 2025: भारताविरुद्ध पाकिस्तानने टॉस जिंकला, प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल; हस्तांदोलन झालं की नाही?

Sangli Accident Death : काम संपवून घरी निघाला होता, समोरू दुचाकी आली अन् दोघेही जाग्यावर संपले; सांगलीतील घटना

SCROLL FOR NEXT