Chandrayaan 3 Updates eSakal
विज्ञान-तंत्र

Chandrayaan 3 Updates : 'चांद्रयान-३'चे तिसरे ऑर्बिट मॅन्यूव्हर यशस्वी; पुढील फायरिंग होणार २० जुलैला

चांद्रयान हे टप्प्या-टप्प्याने पृथ्वीपासून दूर पाठवण्यात येत आहे.

Sudesh

भारताची महत्त्वाकांक्षी चंद्रमोहीम असलेल्या चांद्रयान-३ चे १४ जुलै रोजी यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले होते. सध्या चांद्रयान हे पृथ्वीच्या भोवती फिरत आहे. यात ते टप्प्या-टप्प्याने पृथ्वीपासून दूर जाईल. पृथ्वीभोवती पाच फेऱ्या झाल्यानंतर ते चंद्राच्या दिशेने ढकलण्यात येईल. आज या चांद्रयानाचे तिसरे ऑर्बिट मॅन्यूव्हर यशस्वी झाले.

चांद्रयान लाँच केल्यानंतर दुसऱ्या दिवशी या यानाने पृथ्वीभोवती पहिली फेरी पूर्ण केली होती. यावेळी पहिले अर्थ-बाऊंड ऑर्बिट रेझिंग मॅन्यूव्हर यशस्वीपणे पार पडलं होतं. त्यानंतर १७ जुलै रोजी दुसरं ऑर्बिट रेझिंग मॅन्यूव्हर पार पाडण्यात आलं. यानंतर हे यान पृथ्वीपासून ४१,६०३ बाय २२६ किलोमीटर या कक्षेमध्ये पोहोचलं होतं. यानंतर आज चांद्रयान-३ पुन्हा पुढच्या कक्षेत ढकलण्यात आलं. (Chandrayaan-3 Updates)

चांद्रयान-३ मोहीमेचे सगळे टप्पे वेळेवर पार पडत आहेत. आता याच कक्षेत पृथ्वीची प्रदक्षिणा घातल्यानंतर ते पुन्हा २० जुलै रोजी पुढच्या कक्षेत ढकलण्यात येईल. अशा प्रकारे ३१ जुलैपर्यंत ते पृथ्वीपासून १ लाख किलोमीटर दूरच्या कक्षेत पोहोचवण्याचं इस्रोचं उद्दिष्ट आहे.

कधी होणार लँड?

पृथ्वीच्या कक्षेतून सुटल्यानंतर चांद्रयान-३ हे चंद्राच्या कक्षेत पोहोचेल. त्याठिकाणी देखील चंद्राला प्रदक्षिणा घालत टप्प्या-टप्प्याने ते चंद्राच्या पृष्ठभागाजवळ जाईल. चंद्राच्या पृष्ठभागापासून १०० किलोमीटर उंचीवर असताना लँडर आणि रोव्हर वेगळे होतील, आणि विक्रम लँडर सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न करेल. २३ किंवा २४ ऑगस्ट रोजी हे लँडिंग होण्याची शक्यता इस्रोने व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT