Chandrayaan 5 India Japan Update esakal
विज्ञान-तंत्र

Chandrayaan 5 Explainer : चंद्रावर भारताची पुन्हा एकदा झेप, ISRO अन् जपानची 'चंद्रयान-5' मोहीम आहे तरी काय? वाचा सविस्तर

Chandrayaan 5 India Japan Update : भारत आणि जापान एकत्र येऊन चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाण्याचा शोध घेण्यासाठी 'चंद्रयान-5' मोहीम राबवणार आहेत. ISRO आणि JAXA यांची ही संयुक्त मोहीम भविष्यातील अंतराळ संशोधनासाठी निर्णायक ठरणार आहे.

Saisimran Ghashi

Chandrayaan 5 Update : चंद्रावर पाण्याच्या शोधासाठी भारत आणि जपान एकत्र येत असून त्यांच्या संयुक्त मोहिमेचे नाव आहे चंद्रयान-5, ज्याला LUPEX (Lunar Polar Exploration) म्हणूनही ओळखले जाणार आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आणि जपानची JAXA (Japan Aerospace Exploration Agency) यांच्या सहकार्याने ही महत्त्वाकांक्षी मोहीम पुढील वर्षी सुरू होणार आहे. भारत सरकारने मार्च २०२५ मध्ये या मोहिमेसाठी अधिकृत मंजुरी दिली आहे.

‘चंद्रयान-5’ चंद्रावर काय करणार ?

‘चंद्रयान-5’ चे मुख्य उद्दिष्ट आहे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील "Permanent Shadow Region" (PSR) मध्ये पाणी आणि बर्फाच्या स्वरूपातील पाण्याचा शोध घेणे. हे क्षेत्र चंद्रावर कायम सावलीत असल्यामुळे येथे पाण्याचे ठसे असण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.

या मोहिमेमुळे भविष्यातील मानववस्ती, इंधन निर्मिती आणि चंद्रावर स्थायी बेस उभारण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण माहिती मिळण्याची आशा आहे.

मिशनची वैशिष्ट्ये

  • एकूण वजन- सुमारे 6.5 टन

  • रोव्हरचे वजन- 250 किलो (चंद्रयान-3 मधील ‘प्रज्ञान’ रोव्हरपेक्षा दहा पट अधिक)

  • रोव्हरची ऑपरेशनल कालावधी- 100 दिवस (परिस्थितीनुसार एक वर्षापर्यंत वाढवता येऊ शकते)

या रोव्हरमध्ये खालील अत्याधुनिक उपकरणे असणार आहेत

  • वॉटर अ‍ॅनालायझर

  • स्पेक्ट्रोमीटर

  • ग्राउंड-पेनेट्रेटिंग रडार

  • 1.5 मीटर खोल ड्रिलिंग यंत्र जे चंद्रमातीचे (lunar regolith) नमुने घेईल

आंतरराष्ट्रीय सहकार्य

  • ISRO - लँडर आणि भारतीय वैज्ञानिक उपकरणे विकसित करणार

  • JAXA -रोव्हर विकसित करत आहे

  • NASA आणि युरोपियन स्पेस एजन्सी (ESA) - न्युट्रॉन आणि मास स्पेक्ट्रोमीटरसारख्या विशेष उपकरणांचा समावेश करणार

ही मोहीम जपानच्या H3 रॉकेटने अंतराळात झेपावणार आहे, जे ISRO आणि JAXA यांच्यातील ऐतिहासिक सहकार्याचे प्रतीक ठरेल.

भारताची चंद्र मोहिमांतील वाटचाल

‘चंद्रयान-5’ ही भारताच्या चंद्रमोहिमांच्या सातत्यपूर्ण प्रगतीचा पुढचा टप्पा आहे. चंद्रयान-3 ने यशस्वीरित्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग केले होते. त्यानंतर ‘चंद्रयान-4’ वर काम सुरू आहे आणि आता ‘चंद्रयान-5’ ही आंतरराष्ट्रीय भागीदारीतून होणारी ऐतिहासिक झेप आहे.

‘चंद्रयान-5’ ही केवळ एक शास्त्रीय मोहीम नाही, तर ती भारतीय अंतराळ संशोधनाची जागतिक व्यासपीठावर उभारलेली मजबूत पावले दर्शवते. चंद्रावरील पाण्याचा शोध केवळ वैज्ञानिकदृष्ट्या नव्हे, तर मानवजातीच्या भविष्यकाळातील अंतराळवास्तव्याच्या दृष्टिकोनातूनसुद्धा अत्यंत निर्णायक ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Gavaskar: क्रिकेटमध्ये सर्वच विद्यार्थी, गावसकर; कोणीही मास्टर नसतो ! वानखेडेवर शरद पवार संग्रहालयाचे उद्घाटन

Latest Marathi News Updates : जम्मू-पठाणकोट महामार्गाजवळील सहर खड नदीवरील खचला

Jabrat Poster: मैत्रीचा गोडवा सांगणारा ‘जब्राट’; पोस्टर लाँच, प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली

Shivaji Maharaj: मुंबई पोलिसांच्या लाठीमागे छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा

Ganesh Festival 2025 : खरेदीसाठी बाजारपेठा गजबजल्या; पूजा आणि सजावटीच्या साहित्यासाठी पुणेकरांची लगबग

SCROLL FOR NEXT