Chat Gpt esakal
विज्ञान-तंत्र

‘चॅटजीपीटी’ ला आता ‘क्यू’ ची टक्कर

लास वेगासमध्ये ॲमेझॉनची घोषणा; तूर्त तांत्रिक चाचण्या सुरू

सकाळ डिजिटल टीम

न्यूयॉर्क (वृत्तसंस्था) : ‘ओपन एआय’च्या ‘चॅटजीपीटी’ या चॅटबॉटला टक्कर देण्यासाठी आता ॲमेझॉन ही आघाडीची कंपनी मैदानात उतरली आहे. ॲमेझॉनकडून लवकरच ‘क्यू’ हे बिझनेस चॅटबॉट लाँच करण्यात येणार असून त्याच्या निर्मितीमध्ये जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला आहे.

लास वेगास येथील वार्षिक परिषदेमध्ये ही घोषणा करण्यात आली. तूर्त या चॅटबॉटच्या प्राथमिक टप्प्यातील तांत्रिक चाचण्या सुरू आहेत.

सध्या ॲमेझॉनच्या ‘एडब्लूएस क्लाउड कॉम्प्युटिंग’ सेवेचा जगभर मोठा बोलबाला आहे. आता या तंत्रज्ञानाच्या माध्यमातूनच ‘ॲमेझॉन’ ही कंपनी ‘ओपनएआय’ शी टक्कर घेणार असल्याचे समजते. ‘ओपनएआय’ या कंपनीने ‘चॅटजीपीटी’ हे नवे चॅटबॉट बाजारात आणल्यानंतर जगभरातील यूजरच्या त्याच्यावर अक्षरशः उड्या पडल्या होत्या.

या कंपनीला आर्थिक पाठबळ देणाऱ्या मायक्रोसॉफ्टला देखील याचा मोठा लाभ झाला होता. ‘चॅटजीपीटी’ला मायक्रोसॉफ्ट या कंपनीने तयार केलेल्या तंत्रज्ञानाचा मोठा लाभ झाला होता. मायक्रोसॉफ्टने तयार केलेले ‘कोपायलट’ हे स्वतःचे एआय टूल जगभर चर्चेचा विषय ठरले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT