चॅट जिपीटीने मॅक ओएस (MacOs) अॅप रिलीज केला आहे esakal
विज्ञान-तंत्र

Apple Chatbot : आता मॅक मध्ये सुद्धा 'चॅटबॉट'

AI in Macbook : वर्षाच्या अखेरपर्यंत विंडोजसाठी येणार ChatGPT ॲप

सकाळ डिजिटल टीम

Chat GPT : मॅक युजर्सनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चॅट जिपीटी चॅटबॉट आता वापरणे आता अधिक सोयीस्कर झाले आहे. कंपनीने त्यांचा नवा मॅक ओएस (MacOs) अॅप रिलीज केला आहे. विंडोज वापरणाऱ्या यूजर्सची चिंता मिटली आहे कारण त्यांच्यासाठी या वर्षाच्या अखेरपर्यंत अॅप येणार आहे.

चॅटजीपीटीचे हे अॅप मोफत आहे आणि तो GPT-4o या त्यांच्या अत्याधुनिक मॉडेलसोबत पूर्णपणे कार्यरत आहे. विशेष म्हणजे, हे अॅप तुमच्या मॅकच्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये स्टोअर होतो. त्यामुळे तुम्ही वेगवेगळ्या अॅप्स आणि सर्व्हिसमध्ये थेट चॅटजीपीटीचा वापर करू शकता. (ऑप्शन + स्पेस) ही शॉर्टकट वापरून तुम्ही त्याला त्वरित उघडू शकता.

चॅटजीपीटीचा हा डेस्कटॉप अॅप आवाजात संवादही (Audio Communication) करू शकतो. लवकरच तो GPT-4o च्या ऑडिओ आणि व्हिडिओ देखील वापरेल. सध्या हे अॅप फक्त चॅटजीपीटीचे Plus सबस्क्रिप्शन घेतलेले वापरकर्ते वापरू शकतात. पण लवकरच तो सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे.

यापूर्वी मॅक अॅप स्टोअरवर अनेक बनावट चॅटजीपीटी अॅप्स आढळून आल्या होत्या. मात्र कंपनीचे अधिकृत अॅप अजून प्रकाशित झालेले नाही. काही वापरकर्त्यांनी ओपनएआयच्या डायरेक्टरीमधून अॅप डाउनलोड केले. पण लॉग इन करण्याचा प्रयत्न करताना त्यांना “लवकरच येत आहे” (coming soon) तसेच $20 मासिक भरणारा Plus सबस्क्रिप्शन नसेल तर अॅप वापरता येत नाही असा मेसेज आला.

चॅटजीपीटीने आधी आपला मोबाईल अॅप आयफोनसाठी रिलीज केला होता आणि काही महिन्यांनंतर अँड्रॉइडसाठी आणला होता. त्याचप्रमाणे आता मॅकसाठी डेस्कटॉप अॅप आला आहे आणि विंडोजसाठीचा अॅप या वर्षाच्या अखेरपर्यंत येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT