स्मार्टफोनसाठी डिटॅचेबल की-बोर्ड! 
विज्ञान-तंत्र

स्मार्टफोनसाठी डिटॅचेबल की-बोर्ड!

वृत्तसंस्था

आपल्या टचस्क्रीन स्मार्टफोनवर टायपिंगसाठी आता लवकरच "डिटॅचेबल की-बोर्ड' उपलब्ध होणार आहे. अमेरिकेच्या रियान सीक्रेस्ट यांनी टचस्क्रीन फोनला जोडता येणारा "टायपो की-बोर्ड' तयार केला आहे. हा की-बोर्ड फोनच्या खालच्या बाजूने जोडून ब्लूटूथद्वारा फोनला जोडता येतो. मागील बाजूने पाहिल्यास तो फोनचे कव्हर असल्यासारखा दिसतो. ऍपल फोनला हा की-बोर्ड जोडल्यास त्याची जाडी पाव इंचाने वाढते, तर लांबी एक इंचाने वाढते. ""हे डिझाईन तयार करताना आम्ही टायपिंग करात येईल, फोनला संरक्षणही मिळेल व आयफोनची लांबी व जाडी कमीत कमी वाढेल, हा विचार प्रामुख्याने केला होता,'' असे कंपनीच्या प्रवक्‍त्याने सांगितले. ""आमचे काही मित्र टायपिंगसाठी एक फोन व दुसरा आयफोन इतर कामांसाठी वापरत होते. मी माझ्या मित्राबरोबर जेवायला बाहेर गेलो तेव्हा आमच्या टेबलवर दोन माणसे आणि चार फोन होते. यातूनच टायपो की-बोर्डची कल्पना सुचली,'' असे कंपनीच्या या प्रकल्पावरील संशोधकांनी स्पष्ट केले. हा की-बोर्ड आयफोनसाठी लॉंच केला आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dance Bar Rule: ऑर्केस्ट्रा आणि डान्स बार नियमांमध्ये मोठे बदल! अश्लील नृत्य करणाऱ्यांना आता नाही माफी; महाराष्ट्र विधानसभेचा मोठा निर्णय

Wari Prasthan 2026:आषाढी वारीसाठी पालखीचं प्रस्थान होतं म्हणजे नेमकं काय ? प्रस्थानत्रयी म्हणजे काय ?

Latest Marathi News Live Update : खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग केला कमी

तब्बल १८ वर्षांनी झी मराठीवर परत येतोय गाजलेला नायक; 'इच्छाधारी नागीण' मालिकेत साकारणार भूमिका, ओळखलंत का?

घरासमोरून अपहरण, २ हजार मृत्यूंचं गूढ अन्...; कोण होते 'सतलुज'चे खरे नायक जसवंत सिंह खालरा?

SCROLL FOR NEXT