Online Gaming Career India eSakal
विज्ञान-तंत्र

Online Gaming : ऑनलाईन गेमिंगमध्ये आयटीपेक्षा जास्त कमाई; भारतीय गेमर्स मिळवतात वर्षाला 6 ते 12 लाख रुपये!

Gaming News in Marathi : भारतात गेमिंगमध्ये मुली आघाडीवर असल्याचं स्पष्ट झालं आहे.

Sudesh

Gaming Industry India : भारतातील ऑनलाईन गेमिंग मार्केट हे अतिशय वेगाने वाढत आहे. 2022 च्या तुलनेत यात 45 टक्के वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. एचपीने याबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. सोबतच, देशातील गेमर्स वर्षाला सुमारे 6 ते 12 लाख रुपये कमाई करत असल्याचंही या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे.

यामुळेच, येत्या काळात अधिकाधिक भारतीय तरुण गेमिंगकडे एक करिअर ऑप्शन म्हणून पाहू शकतील असा विश्वास एचपीचे वरिष्ठ डिरेक्टर विक्रम बेदी यांनी व्यक्त केला. ई-स्पोर्ट्स क्षेत्रात भारत येत्या काही वर्षांमध्ये मोठी भरारी घेणार आहे, असंही ते म्हणाले.

एचपीने या अहवालासाठी देशातील 15 शहरांमधील 3,000 गेमर्सचं सर्वेक्षण केलं. यामध्ये त्यांनी गेमर्सना त्यांच्या कमाईचा स्त्रोत देखील विचारला. ऑनलाईन गेमर्सना सर्वाधिक प्रमाणात स्पॉन्सरशिप आणि ई-स्पोर्ट्स टूर्नामेंटमधून पैसे मिळत असल्याचं यात समोर आलं. यासोबतच यूट्यूबवर स्ट्रीमिंग करूनही चांगले पैसे मिळवता येत असल्याचं स्पष्ट झालं.

58 टक्के महिला गेमर्स

गेमिंगचं क्षेत्र हे गेल्या बऱ्याच वर्षांपासून पुरूषप्रधान समजलं जात होतं. कित्येक गेम्स हे पुरुषांना डोळ्यासमोर ठेऊन तयार करण्यात येत होते. मात्र भारतात गेमिंगमध्ये मुली आघाडीवर असल्याचं स्पष्ट झालं आहे. देशातील गेमर्सपैकी 58 टक्के मुली असल्याचं एचपीच्या सर्व्हेमध्ये दिसून आलं.

गेमिंगला पालकांचीही पसंती

गेमिंग सेक्टरच्या बाबतीत पालकांचा दृष्टिकोन देखील बदलला असल्याचं दिसून येत आहे. देशातील गेमिंग क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही वाढत आहे. यामुळेच गेमिंग हा एक चांगला करिअर ऑप्शन म्हणून समोर येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजारात तेजी! सेन्सेक्स 500 अंकांनी उसळला; कोणते शेअर्स वाढले?

Shaktipeeth Highway Protest : शक्तिपीठ विरोधात कोल्हापुरात विराट मोर्चा; सतेज पाटील, राजू शेट्टी करणार नेतृत्व

London Wari: सातासमुद्रापार पोहोचली विठ्ठलभक्ती! लंडनहून निघाली पंढरीची वारी; प्रथमच लंडन ते पंढरपूर ऐतिहासिक ‘ग्लोबल वारी’

Nagpur: महागाई, गुन्हेगारीविरोधात ‘रास्ता रोको’; विदर्भवाद्यांचा एल्गार; पोलिस-कार्यकर्त्यांमध्ये झटापट, १७ ताब्यात

Suryakumar Yadav: श्रेयसकडे कॅप्टन्सी जाताच सूर्यकुमार यादवचं रौद्ररूप; फक्त ३६ चेंडूंत उडवला धुरळा, वाचा नेमकं काय घडलं"

SCROLL FOR NEXT