Car Care:  Sakal
विज्ञान-तंत्र

Car Care: कडक उन्हात कार आतील बाजूस थंड ठेवण्यासाठी आजच करा 'या' 5 गोष्टी

Car Care: उन्हाळ्यात कार थंड ठेवण्यासाठी पुढील गोष्टी करू शकता.

Puja Bonkile

Car Care: उन्हाळ्यात कारच्या आतील भाग गरम होतो. कारण सूर्याची उष्णता खिडक्यांमधून कारमध्ये येते आणि उष्णता बराच काळ आत राहते. यामुळे कार खुप गरम होते.  उष्णता सहजपणे काचेतून परत जात नाही, त्यामुळे ती गाडीच्या आत अडकून राहते. खिडक्यांमधून कारमध्ये प्रवेश करणारा सूर्यप्रकाश मुख्यतः आतील पृष्ठभागांद्वारे शोषला जातो. नंतर उष्णतेच्या रूपात हवेत परत जातो. कार सूर्यप्रकाशात पार्क करायची असेल तर पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्या.

कारचा आतील भाग थंड राहण्यासाठी काय करावे

 सर्वात आधी  कार सावलीत पार्क करावी. यासाठी झाडाखाली किंवा पार्किंग गॅरेजचा वापर करावा.

कारचे उन्हापासून रंक्षण होण्यासाठी चांगल्या दर्जाचे कार कव्हर वापरावे.

एअर कंडिनर लावावे.

जाड टॉवेल डॅबोशर्ड झाकून ठेवावे.

रिफ्लेक्टिव्ह टिंटेड ग्लासेसचा वार करावा. हे काही प्रमाणात सूर्यप्रकाश परावर्तित करतात, ज्यामुळे कारचे तापमान कमी राहते.

कारमध्ये सीट कव्हर्सचा वापर करावा. सीटचा रंग जितका गडद असेल तितकी जास्त उष्णता शोषून घेईल. त्यामुळे काळ्या, तपकिरी किंवा मरून रंगाच्या सीटसाठी लहक्या रंगाचे सीट कव्हर्स खरेदी करावे.

कारच्या खिडक्या उघड्या ठेवाव्या. यामुळे उष्णता बाहेर पडते.

कारचे इंजिन जास्त गरम होण्यामागे कोणती कारणे असू शकतात

कुलेंटमध्ये प्रक्रियेत गळती असणे

कारमधील पाईप ब्लॉक होणे

रेडिएटरमध्ये समस्या निर्माण होणे

कारमधील ऑइल कमी होणे

उन्हाळ्यात कारचा आतील भाग थंड ठेवल्यास काय होते?

उन्हाळ्यात कारचा आतील भाग थंड ठेवल्याने ड्रायव्हिंग आरामदायी आणि आनंददायी होऊ शकते. यामुळे कारच्या एअर कंडिशनरपेक्षा थंड होण्यासाठी जास्त वापरल्या जाणाऱ्या इंधनाचीही बचत होते. तसेच लांबचा प्रवास सुखकर होतो.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT