Elon Musk Car Thief eSakal
विज्ञान-तंत्र

Elon Musk Car Thief : इलॉन मस्कने चोरी केली होती कार, पोस्टमध्ये स्वतःच दिली कबूली; नेमकं काय घडलं?

Elon Musk X post : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये इलॉन मस्कचा समावेश आहे.

Sudesh

Elon Musk stole Car : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये इलॉन मस्कचा समावेश होतो. स्पेस एक्स, टेस्ला, एक्स (आधीचे ट्विटर), न्यूरालिंक अशा जगातील मोठ्या कंपन्या मस्कच्या मालकीच्या आहेत. मात्र या इलॉन मस्कने लहानपणी एक गुन्हा देखील केला होता. आपण लहानपणी कार चोरी केल्याची कबूली मस्कने स्वतःच दिली आहे.

टेस्लाचे शेअर होल्डर असणाऱ्या स्टीव्ह मार्क यांनी एक्सवर बाल्डर्स गेट 3 या गेमची प्रशंसा केली होती. याला रिप्लाय देत इलॉन मस्कने इतर काही गेम्सचा उल्लेख केला. यासोबतच त्यांनी आपल्या लहानपणीचा एक किस्सा देखील शेअर केला.

स्टीव्ह मार्क म्हणाले, की "मी डी अँड डी (डंजन्स अँड ड्रॅगन्स) ही गेम कधी खेळली नव्हती. त्यामुळे बाल्डर्स गेट 3 मला आवडेल की नाही याबाबत आशंका होती. मात्र, ही गेम खरंच मस्त आहे." यावर रिप्लाय देताना मस्क म्हणाले की, "मी लहानपणी डंजन्स अँड ड्रॅगन्स बोर्ड गेम खेळली आहे. बाल्डर्स गेट 3 देखील चांगली गेम आहे." (Tech News)

दुसरा गुन्हा केला कबूल

यालाच दुसरा एक रिप्लाय करत इलॉन मस्कने आपला गुन्हा कबूल केला. "मी लहानपणी एकच गुन्हा केला होता, तो म्हणजे कारची चोरी. मी आणि माझ्या मित्राने रात्री उशीरा एक कार चोरी केली होती. ती घेऊन आम्ही एका बुक स्टोअरमध्ये गेलो, जिथून आम्ही D&D मोड्यूल विकत घेतलं. मी तेव्हा कदाचित 13 किंवा 14 वर्षांचा होतो."

"आम्ही ती कार पुन्हा जिथे होती तिथे, आणि जशी होती तशीच ठेवली होती." असंही इलॉनने या पोस्टमध्ये स्पष्ट केलं आहे. यामुळेच कार चोरी झाल्याचं मालकाला समजलं नाही, आणि त्याबाबत तक्रार देखील दाखल झाली नाही. म्हणूनच या कार चोरी प्रकरणात इलॉन मस्कला शिक्षा झाली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT