Tesla India Import and factory eSakal
विज्ञान-तंत्र

Tesla India : पुढील वर्षापासून भारतात उपलब्ध होणार टेस्ला? प्लांट उभारण्यासाठी करणार 2 बिलियन डॉलर्सची गुंतवणूक - रिपोर्ट

Tesla Pact with India : भारत सरकार आणि टेस्ला कंपनीत होणारा करार आता शेवटच्या टप्प्यात पोहोचल्याचं वृत्त समोर येत आहे.

Sudesh

Tesla EV import in India : जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक कार निर्मिती कंपनी टेस्ला आता भारतात येण्यासाठी सज्ज झाली आहे. भारत सरकार आणि टेस्ला कंपनीत होणारा करार आता शेवटच्या टप्प्यात पोहोचल्याचं वृत्त समोर येत आहे. यामुळे पुढील वर्षापासून देशात टेस्ला कारची विक्री सुरू होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

इकॉनॉमिक्स टाईम्सने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटमध्ये याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता असल्याचं एका सूत्राने सांगितलं आहे. पुढील दोन वर्षांमध्ये टेस्ला भारतात आपला प्लांट देखील उभारू शकते. यासाठी गुजरात, महाराष्ट्र आणि तामिळनाडूचा विचार केला जात आहे.

2 बिलियन डॉलर्सची गुंतवणूक

टेस्ला भारतातील आपल्या प्लांटसाठी तब्बल दोन बिलियन डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. यानंतर भविष्यात ही गुंतवणूक 15 बिलियन डॉलर्स एवढी होऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. भारतात बॅटरींच्या निर्मितीचा देखील टेस्ला प्रयत्न करेल, असंही म्हटलं जात आहे.

अद्याप याबाबत अंतिम निर्णय किंवा कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, इलॉन मस्क यांनी यापूर्वीच आपण भारतात येण्यासाठी उत्सुक असल्याचं म्हटलं आहे. टेस्लाने पुण्यामध्ये पुढील काही वर्षांसाठी ऑफिस स्पेस देखील भाड्याने घेतलं आहे. (Automobile News)

10-20 लाखांमध्ये मिळणार कार

भारतात तयार होणाऱ्या टेस्ला कारची किंमत साधारणपणे 20,000 डॉलर्स, म्हणजेच जवळपास 16.50 लाख रुपये असण्याची शक्यता काही तज्ज्ञांनी व्यक्त केली होती. तर इतर काही रिपोर्ट्समध्ये असंही म्हटलं होतं की ही किंमत 10 लाख रुपये एवढी कमी असू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT