Electric Motorcycle
Electric Motorcycle  sakal
विज्ञान-तंत्र

EVTRIC Motorsकडून इलेक्ट्रिक बाईक ‘राईझ’ लॉन्च

सकाळ डिजिटल टीम

ईव्हीट्रीक मोटर्स या पुण्यातील पीएपीएल इलेक्ट्रिक वाहनांच्या व्हेंचरने ईव्हीट्रीक राईझ या इलेक्ट्रिक मोटरसायकलचा शुभारंभ केला. ही उच्च वेगाची मोटरसायकल या ब्रँडची पहिली आकर्षक आणि रुबाबदार शैलीची व अतिशय अद्ययावत तंत्रज्ञान असलेली इलेक्ट्रिक मोटरसायकल आहे. (EVTRIC Motors launched electric motorcycle named rise)

ईव्हीट्रीक मोटर्सच्या टीमने सिकर, राजस्थान येथील वितरकांच्या बैठकीमध्ये या उत्पादनाची घोषणा रू. १,५९,९९० (भारतातील एक्स- शोरूम) ह्या दराने केली.

हा ब्रँड इलेक्ट्रिक वाहन सेग्मेंटमध्ये ‘मेक इन इंडिया’ या सर्वोच्च व्हिजनला चालना देत आहे. बहुप्रतीक्षित इलेक्ट्रिक बाईक ईव्हीट्रीक राईझमध्ये ७० किमी/ प्रति तास ही सर्वोच्च स्पीड असेल आणि एका चार्जवर ती सहजपणे ११० किलोमीटर इतके अंतर पार करेल. तिच्यामध्ये लिथियम आयनची बॅटरी आहे व ती ४ तासांमध्ये पूर्ण चार्ज होते.

ऑटो कट फीचरसह येणा-या १० एएमपी मायक्रो चार्जरसह युजर्सना ह्या बाईसची बॅटरी चार्ज करणे सोपे आणि सुरक्षित आहे. त्यामध्ये रुबाबदार स्पोर्टी लूक आहे व बाजूंवर शार्प कटस दिलेले आहेत. त्यामध्ये एलईडी व दिवसाचे लाईट फंक्शन दिले गेलेले आहे. त्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण रिअर विंकर्सही आहेत व त्याद्वारे युजर्सना अद्ययावत वैशिष्ट्यांचा लाभ मिळतो.

राईझला २००० वॉट बीएलडीसी मोटर जोडलेली आहे व तिची ७०v/४०ah लिथियम आयन बॅटरी आहे. ही नवी बाईक आकर्षक लाल व काळ्या रंगात उपलब्ध आहे व ही बाकी दैनंदिन प्रवासामध्ये एक रुबाबदार सुविधा मिळवून देते.

पेट्रोल ते इलेक्ट्रिक वाहनांच्या दिशेने बदल अनुभवत असलेल्या भारतीय युजर्सना उत्तम गुणवत्तेच्या इलेक्ट्रिक वाहनांची सेवा देण्यासाठी हा ब्रँड सलग भारतात बनलेल्या उत्पादनांचा शुभारंभ करत आहे. सध्या, ब्रँडकडे आधीच 3 इलेक्ट्रिक स्कूटर्स रस्त्यावर वापरात आलेल्या आहेत- ईव्हीट्रीक एक्सिस, ईव्हीट्रीक राईड आणि ईव्हीट्रीक मायटी आणि कंपनीचे भारतातील २२ राज्यांमध्ये १२५ टचपॉईंटस आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

Ganesh Naik: आम्हाला प्रेमाने दिलेला आदेश आवडतो, तंबी देणारा जन्मलेला नाही

IPL 2024 LSG vs KKR : ४८ तासांच्या आत कोलकता पुन्हा मैदानात! लखनौ सुपर जायंटस् विरुद्ध आज सामना

Poonch Attack: 30 महिने... सहावा हल्ला अन् 21 जवानांचे बलिदान; भारतीय लष्कर सतत ठरत आहे दहशतवाद्यांचे टार्गेट

Latest Marathi News Live Update : सुनेत्रा पवार यांच्यासाठी अजित पवार यांची सांगता सभा

SCROLL FOR NEXT