Meta Google
विज्ञान-तंत्र

Facebook चे नाव आणि लोगो बदलला; काय आहे त्यामागचं प्लॅनिंग?

सकाळ डिजिटल टीम

फेसबुकचे (Facebook) सीईओ मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांनी ते त्यांच्या कंपनीचे नाव बदलून मेटा प्लॅटफॉर्म इंक (Meta Platforms Inc.) करत असल्याची घोषणा केली. झुकरबर्ग यांनी या रीब्रँडिंगबद्दल सांगीतले की, फेसबुक नाव हे कंपनी आता करत असलेल्या सर्व गोष्टी कव्हर करत नाही. झुकेरबर्ग यांनी मेटाला 'virtual environment' चे स्वरूप दिले आहे. यापूर्वी, फेसबुकने जाहीर केले होते की ते ऑगमेंटेड आणि व्हर्च्युअल रिअॅलिटीसाठी स्वतंत्रपणे फायनांशियल रिझल्ट पब्लिश करण्यात येतील . फेसबुकच्या या नवीन आवातारामध्ये लोक Metaverse व्हर्चुअल रियालीटी हेडसेट वापरून भेटू शकतात, काम करू शकतात आणि खेळू शकतात.

Metaverse काय आहे?

मेटाव्हर्स (Metaverse) ही एक कंप्युटर जनरेटेड स्पेस आहे, जेथे लोक एकमेकांशी संवाद साधू शकतात. यामध्ये अनेक वेगवेगळ्या व्यवसायांचा समावेश असेल, जसे की व्हर्चुअल रियालीटी हार्डवेअर ब्रांच ऑक्युलस आणि होरायझन वर्ल्ड, त्याचबरोबर अनेक व्हर्चुअल रियालीटी सॉफ्टवेअर जे अद्याप बीटा टेस्टिंग मोडमध्ये आहेत.

नवीन लोगो

कोणतीही कंपनी जेव्हा आपले नावाचे रिब्रँडींग करते तेव्हा ती कंपनी आपला लोगो देखील बदलते, फेसबुकनेही तेच केले आहे. Facebook चे नवीन इंनफीनीटी आकार असलेला लोगो मेटावर्सला रिप्रझेंट करेल.

इतर अॅप्सची नावे बदलली जातील का?

फेसबुक अॅपचे नाव बदलले जाणार नाही, तसेच इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप आणि फेसबुक मेसेंजरची नावे बदलली जाणार नाहीत. कंपनीची कॉर्पोरेट रचना देखील बदलणार नाही. पण 1 डिसेंबरपासून त्याचा स्टॉक एमव्हीआरएस या नवीन टिकर सिंबलखाली कामकाज करने सुरू करेल.

Metaverse मध्ये काय मिळेल?

Metaverse ही एक नवीन ऑनलाइन स्पेस असेल जी तुम्हाला पूर्णपणे वेगळ्या जगाचा अनुभव देईल . या स्पेसमध्ये, लोक वास्तविक जगाप्रमाणे एकमेकांशी संवाद साधू शकतील. याच्या मदतीने तुम्ही व्हर्चुअल जगात जाऊ शकता. येथे तुम्ही तुमच्या मित्रांशी किंवा नातेवाईकांशी बोलू शकता आणि त्यांच्यासोबत फिरायला जाऊ शकता. तुम्ही येथे खरेदी करू शकता. तुम्ही तुमची स्वतःची कार Metaverse मध्ये खरेदी करू शकता आणि ती खऱ्या जगाप्रमाणेच वापरू शकता. यामध्ये, वापरकर्त्याकडे एक कॅरेक्टर असेल जे वास्तविक जगाप्रमाणे इतर खेळाडूंसोबत संवाद साधू शकेल, त्यांच्यासोबत खेळू शकेल. यामध्ये, वापरकर्ते क्रिप्टोकरन्सीसह व्हर्चुअल जमीन आणि इतर डिजिटल एसेट्स खरेदी करू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोक शिव्या देतात, स्वागताला आलेल्या कार्यकर्त्यांना अजितदादांनी झापलं; VIDEO VIRAL

Maharashtra Latest News Update: मुंबई-गोवा महामार्ग अवजड वाहनासांठी बंद

Income Tax Return : कर सल्लागारांची तारेवरची कसरत; प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची तारीख वाढविल्याचा परिणाम

BCCI निवड समितीमधील 'या' सदस्याची उचलबांगडी करणार, अजित आगरकरचा करार...

UPSC Mains: युपीएससी मेन्समध्ये उत्तर लिहिताना 'या' 5 चुका करू नका, अन्यथा...

SCROLL FOR NEXT