Air Conditioner Cooling and Servicing Tips esakal
विज्ञान-तंत्र

AC Cooling Tips : एसी सर्व्हिसिंग करूनही थंड होत नाही? असू शकतात 'ही' 5 गंभीर कारणे, वेळीच लक्ष द्या नाहीतर होईल मोठे नुकसान

Air Conditioner Cooling and Servicing Tips : एसी सर्व्हिसिंगनंतरही योग्य प्रकारे थंड करत नसेल, तर त्यामागे अनेक गंभीर कारणे असू शकतात.

Saisimran Ghashi

AC Tips : उन्हाळ्याच्या दिवसांत एसी म्हणजेच एअर कंडिशनर हा घराचा एक अत्यावश्यक भाग बनतो. मात्र एसीची वेळच्या वेळी सर्व्हिसिंग करूनही तो व्यवस्थित थंड करत नसेल, तर ती चिंता करण्यासारखी बाब असते. अनेकदा वरवरच्या सर्व्हिसिंगमध्ये काही खोलातली कारणे दुर्लक्षित राहतात आणि त्याचा परिणाम थेट एसीच्या कार्यक्षमतेवर होतो. असही पाच महत्वाची कारणे आहेत जी एसीच्या थंड न होण्यामागे जबाबदार असू शकतात.

1. गॅस लीक (रेफ्रिजरंट गळती)

एसीमधील गॅस म्हणजे रेफ्रिजरंट जर कमी झाला असेल किंवा लीक होत असेल, तर त्याचा थेट परिणाम थंड होण्यावर होतो. अनेकदा सर्व्हिसिंगदरम्यान तांत्रिक लोक फक्त बाहेरची स्वच्छता करतात आणि गॅस प्रेशर तपासत नाहीत. गॅस लीक असल्यास हळूहळू थंड होणं, बर्फ साठणे किंवा शिसशिस आवाज ऐकू येणं हे लक्षणं असू शकतात.

2. फिल्टर आणि कॉइल्समध्ये धूळ

फिल्टर आणि कॉइल्स जर धुळीने भरलेले असतील, तर एसीमधून योग्यप्रकारे थंड हवा फिरू शकत नाही. वरवरची सफाई करून चालत नाही, तर खोल स्वच्छता आवश्यक असते, विशेषतः ज्या भागांत धूळ जास्त आहे तिथे.

3. खराब कंप्रेसर

कंप्रेसर जर नीट काम करत नसेल, तर एसी कितीही चांगलं सर्व्हिसिंग केलं असलं, तरीही हवा थंड होणार नाही. कंप्रेसर बिघडल्यास विचित्र आवाज, सतत बंद-चालू होणं यासारखी लक्षणं दिसतात. याकडे दुर्लक्ष केल्यास मोठा खर्च होऊ शकतो.

4. इन्सुलेशन किंवा एसी साइज

तुमची खोली जर नीट इन्सुलेट केलेली नसेल म्हणजे खिडक्या-दारांमधून थंडी बाहेर जात असेल, किंवा खोली मोठी असून एसीचा टन योग्य नसेल, तर तो थंड करत नाही. थेट उन्हाचा परिणाम, उंच छत किंवा गळक्या भिंती यामुळेही थंडी टिकत नाही.

5. थर्मोस्टॅट किंवा सेन्सरचा बिघाड

कधी कधी समस्या एसीमध्ये नसून थर्मोस्टॅट किंवा टेम्परेचर सेन्सरमध्ये असते. जर ते चुकीचं तापमान मोजत असतील, तर एसी योग्यप्रकारे काम करत नाही. रिमोट व्यवस्थित काम करतोय का, सेन्सर योग्य ठिकाणी आहे का, हे तपासणे आवश्यक आहे. जर एसी पूर्ण सर्व्हिसिंगनंतरही थंड करत नसेल, तर ही बाब हलक्यात घेऊ नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bigg Boss 19 Winner: गौरव खन्ना ठरला बिग बॉस 19 चा विजेता, फरहाना भट्ट ठरली रनरअप

Mumbai: बीएमसीच्या प्रारूप मतदार यादीत मोठे बदल; चार वॉर्डमध्ये ५०% पेक्षा जास्त वाढ, तर २४ वॉर्डमध्ये घट

Khandala : सातारा-पुणे मार्गावर भरधाव ट्रकची अनेक वाहनांना धडक, ट्रकचालक फरार

रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक फिस्कटले! हुतात्मा, वंदे भारत एक्स्प्रेस सोलापूरला वेळेत, पण दक्षिणेकडे जाणाऱ्या ‘या’ गाड्या २ ते ३ तासांनी धावताहेत उशिराने

Nanded Drug Seizure : शिवणीत तुरीच्या ताशेत लपवलेला ‘गांजा’ उघड; पोलिसांची धाड, ₹1.60 लाखांचा मुद्देमाल जप्त!

SCROLL FOR NEXT