WhatsApp
WhatsApp Twitter
विज्ञान-तंत्र

WhatsApp मध्ये येणार ५ नवे फिचर्स; जाणून घ्या सविस्तर

सकाळ डिजिटल टीम

WhatsApp हे अ‍ॅप आता कोणालाही नवीन राहिलेलं नाही. या अ‍ॅपच्या माध्यमातून आपण दूरवर असलेल्या कोणत्याही व्यक्तीशी सहज संवाद साधू शकतो. विशेष म्हणजे युजर्ससाठी WhatsApp कायमच नवनवीन फिचर्स आणत असतात. यामध्येच WhatsApp आता ग्राहकांसाठी पाच भन्नाट फिचर्स आणणार असल्याचं म्हटलं जात आहे. विशेष म्हणजे हे फिचर ग्राहकांसाठी फायेदशीर असण्यासोबतच मजेशीर असल्याचं म्हटलं जात आहे. (five upcoming whatsapp feature)

१. Multi-Device -

या फिचरच्या माध्यमातून युजर्स वेगवेगळ्या डिव्हॉइसवर त्याचं WhatsApp एकाच वेळी सुरु करु शकतात. विशेष म्हणजे यासाठी मुख्य डिव्हॉइसमध्ये इंटरनेट सुरु ठेवण्याचीही आवश्यकता नाही. यापूर्वी लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर WhatsApp चालू करतांना मोबाईलवरील नेट कायम चालू ठेवावं लागत होतं. मात्र, आता नव्या फिचरमध्ये इंटरनेट सुरु ठेवण्याची आवश्यकता नाही.

२. Read Later -

WhatsApp मधील काही महत्त्वाचं संभाषण असेल तर ते चॅट आपण आर्काइव्हमध्ये सेव्ह करुन लोकांच्या नजरेपासून वाचवत असतो. असंच काहीसं Read Later हे नवीन फिचर आहे. यामध्ये युजर कोणतेही चॅट Read Later मध्ये पाठवू शकतो आणि विशेष म्हणजे त्या ठराविक चॅटमधील नवीन मेसेजचं नोटिफिकेशन स्क्रीनवरही दिसणार नाही आणि तुमच्या सोयीनुसार, ते चॅट तुम्ही कधीही वाचू शकता.

३. २४ तासात Disappearing Messages -

सध्या व्हॉट्सअ‍ॅपवर Disappearing Messages हे फिचर सात दिवसांसाठी अॅक्टिव्ह असते. त्यामुळे Disappearing Messages चालू केल्यानंतर ७ दिवसांनी WhatsApp मधील मेसेज आणि फोटो वगैरे आपोआप डिलीट होतात. परंतु, आता कंपनीने २४ तासांमध्ये मेसेज व फोटो डिलीट करण्याच्या पद्धतीवर काम केलं आहे. म्हणून येत्या काळात 24 तासांमध्ये Disappearing Messages हे फिचर सुरु होऊ शकतं. ज्यामुळे कोणालाही पाठवलेला संदेश आता सात दिवसांऐवजी 24 तासात डीलिट केला जाऊ शकतात.

४. Join Missed Calls -

बऱ्याचदा आपण मित्र-मैत्रिणींना व्हॉट्सअॅपवर ग्रुप कॉल करतो. मात्र, एखादी व्यक्ती कामात असेल तर ती फोन उचलू शकत नाही आणि नंतर तिला त्या कॉलमध्ये अॅडही करता येत नाही. परंतु, Join Missed Calls च्या माध्यमातून कॉल चालू असतांनादेखील तुम्ही नव्या व्यक्तीला त्यात अॅड करु शकता.

५. Instagram Reels -

इन्स्टाग्रामवरील रिल हे फिचर सध्याच्या तरुणाईमध्ये विशेष लोकप्रिय आहे. त्यामुळेच व्हॉट्सअॅपदेखील लवकरच हे फिचर सुरु करणार असल्याची चर्चा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma T20 WC 24 : टी 20 वर्ल्डकप तोंडावर आलाय अन् रोहित पुन्हा फेल गेला... माजी खेळाडूनं व्यक्त केली चिंता

नववधूने तब्येत ठीक नसल्याचं सांगत अंगाला स्पर्श करु दिला नाही, दहाव्या दिवशी दाखवले रंग!

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला उडणार सोने खरेदीला झुंबड, पण सोनं खरं की भेसळयुक्त असं करा चेक!

Lok Sabha Election : नाशिकमधून मोठी बातमी! शांतिगिरी महाराजांचा अर्ज बाद पण...; दिंडोरीमधूनही 5 अर्ज बाद

Adhyayan Suman : बेरोजगारी आणि आलेलं नैराश्य; हिरामंडीतील अभिनेता म्हणाला,"व्यसनाच्या आहारी जाणार होतो पण..."

SCROLL FOR NEXT