Flipkart
Flipkart Sakal
विज्ञान-तंत्र

Smartphone Offer: Flipkart चा धमाकेदार सेल सुरू, निम्म्या किंमतीत मिळतायत ब्रँडेड स्मार्टफोन्स; ऑफर एकदा पाहाच

सकाळ डिजिटल टीम

Flipkart Big Saving Days Sale Starts: ई-कॉमर्स साइट Flipkart वर Big Saving Days Sale सुरू झाला आहे. प्लस मेंबर्ससाठी हा सेल आजपासून सुरू झाला आहे. तर इतर यूजर्स १६ डिसेंबरपासून या सेलचा फायदा घेऊ शकतात. फ्लिपकार्टचा हा सेल २१ डिसेंबरपर्यंत चालेल.

Flipkart Big Saving Days Sale 2022 मध्ये तुम्हाला अनेक प्रोडक्ट्सवर बंपर डिस्काउंटचा फायदा मिळेल. सेलमध्ये स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस, होम अ‍ॅप्लायन्सेज, फॅशन प्रोडक्ट आणि इतर वस्तूंना स्वस्तात खरेदी करू शकता. Flipkart Pay Later चा पर्याय वापरून वस्तूंची खरेदी केल्यास २५० रुपयांचे गिफ्ट कार्ड देखील मिळेल.

हेही वाचा : प्राप्तिकर- कशाने मिळेल सूट, कशावर भरावा लागेल कर....

iPhone 14 ला स्वस्तात करा खरेदी

Flipkart Big Saving Days Sale मध्ये तुम्ही काही महिन्यांपूर्वीच लाँच झालेल्या iPhone 14 ला बंपर डिस्काउंटसह खरेदी करू शकता. सेलमध्ये आयफोन १४ फक्त ७८,७४० रुपये किंमतीत उपलब्ध आहे. याशिवाय, ईएमआय ट्रांजॅक्शनवर १ हजार रुपये डिस्काउंट देखील मिळेल. एक्सचेंज ऑफरचा फायदा मिळाल्यास फोनला अजूनच स्वस्तात खरेदी करू शकता.

Poco M3 आणि Realme C20 वर बंपर सूट

फ्लिपकार्ट सेलमध्ये Poco M3 आणि Realme C20 स्मार्टफोन देखील स्वस्तात उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्ही जर कमी किंमतीत दमदार फीचर्ससह येणारे स्मार्टफोन्स शोधत असाल तर हे चांगले पर्याय आहेत. हे दोन्ही ४जी फोन्स आहेत

भारतात ५जी नेटवर्क उपलब्ध झाले आहे. त्यामुळे तुम्ही थोडे अतिरिक्त पैसे खर्च करून ५जी फोन खरेदी करू शकता. तुम्ही जर ४जी स्मार्टफोन खरेदी केल्यास तुम्हाला हँडसेट अपग्रेड करताना पुन्हा पैसे खर्च करावे लागतील. किंमतीबद्दल सांगायचे तर Poco M3 मध्ये फक्त १०,९९९ रुपयात उपलब्ध आहे. तर Realme C20 साठी ७,४९९ रुपये खर्च करावे लागतील. याशिवाय, फ्लिपकार्ट सेलमध्ये विवो, शाओमी व इतर कंपन्यांचे फोन्स देखील स्वस्तात उपलब्ध आहेत.

हेही वाचा: Twitter: एलॉन मस्कचा पाठलाग करत होता पठ्ठ्या, आता ट्विटरने उचलले मोठे पाऊल; पाहा डिटेल्स

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : पुण्यात सशस्त्र दरोडा! सात जणांनी लुटलं सोन्याचं दुकान; 'एवढा' मुद्देमाल लंपास

Thoda Tuza Thoda Maza : शिवानीसोबत 'या' अभिनेत्याचाही स्टार प्रवाहवर कमबॅक

DK Shivkumar: डीके शिवकुमार, 100 कोटी अन् भाजप नेता; प्रज्वल रेवन्ना व्हिडिओ प्रकरणातील नवी घडामोड आली समोर

Latest Marathi News Live Update : मनमोहन सिंग, हमीद अन्सारी यांनी घरातूनच केलं मतदान

Hair Care Tips : केसांसाठी फायदेशीर आहे हेअर स्पा, घरीच कसा करायचा ते जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT