Gaganyaan Mission Update eSakal
विज्ञान-तंत्र

Gaganyaan Mission : 'गगनयान' मोहिमेबाबत मोठी अपडेट! लवकरच होणार फ्लाइट टेस्ट, तयारी सुरू

ISRO Space Mission : गगनयान मोहिमेतून भारत पहिल्यांदाच अंतराळात मानव पाठवणार आहे.

Sudesh

भारताच्या महत्त्वाकांक्षी गगनयान मोहिमेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. इस्रो लवकरच या मोहिमेची मानवरहित फ्लाइट टेस्ट घेणार आहे. फ्लाइट टेस्ट व्हेईकल अबॉर्ट मिशन-1 (TV-D1) या मोहिमेसाठीची तयारी सुरू करण्यात आली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार ही चाचणी 25 किंवा 26 ऑक्टोबर रोजी पार पडू शकते. इस्रोने मात्र याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही. क्रू एस्केप सिस्टीमची ही चाचणी असणार आहे. म्हणजेच, या यानातून अंतराळवीर कशा प्रकारे बाहेर पडतील याची ही चाचणी असणार आहे. या चाचणीवेळी रॉकेटमध्ये मानव नसणार आहेत.

गगनयान मोहीम काय आहे?

या मोहिमेद्वारे इस्रो पृथ्वीच्या खालच्या कक्षेत (LEO) मानवयुक्त अवकाशयान पाठवेल. मानवांना पृथ्वीच्या खालच्या कक्षेत पाठवणे आणि त्यासाठी स्वदेशी क्षमता विकसित करणे हे इस्रोचे उद्दिष्ट आहे. चांद्रयान-3 आणि आदित्य एल-1 नंतर इस्रोची ही सगळ्यात मोठी मोहीम असणार आहे. या मोहिमेसाठी अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्था नासा देखील इस्रोची मदत करणार आहे.

काही दिवसांपूर्वी या मोहिमेतील अंतराळवीरांची ट्रेनिंग सुरू असल्याचा व्हिडिओ समोर आला होता. तसंच त्यापूर्वी ड्रोग पॅराशूटची देखील यशस्वी चाचणी घेण्यात आली होती. यामुळे या मोहिमेच्या तयारीला वेग आल्याचं स्पष्ट होतंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Green Maharashtra: हरित महाराष्ट्रासाठी मोठा निर्णय; वृक्षलागवड लक्ष्य तर वृक्षतोडीस सुलभ परवानगी, तीनशे कोटी झाडे लावणार, आयोग काय करणार?

पिकअप उलटून भीषण अपघातात १२ जणांचा जागीच मृत्यू, २० जण गंभीर जखमी; घटनास्थळी मृतदेहांचा खच

Earthquake in Ladakh: लडाखमध्ये पहाटे जमीन हादरली! भूकंपाचं केंद्र 150 किलोमीटर खोल; किती होती तीव्रता?

Father dies after daughter wedding : मुलीच्या लग्नासाठी आयुष्यभर बाप झिजला अन् पाठवणीनंतर जगातून कायमचा निघून गेला... पन्हाळा तालुक्यात हळहळ

Cabbage-Cucumber Sandwich: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट उपाय! बनवा एकदम फ्रेश आणि हेल्दी कोबी-काकडी-अ‍ॅव्हकाडो सँडविच

SCROLL FOR NEXT