Instinct 2X Solar Esakal
विज्ञान-तंत्र

Instinct 2X Solar : उन्हामध्ये चार्ज होईल ही स्मार्टवॉच, अंधारात दाखवेल रस्ता! पाहा किंमत

यूएस मिलिट्रीच्या मानकांनुसार या घड्याळाच्या थर्मल, शॉक आणि वॉटर रजिस्टंस चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

Sudesh

प्रीमियम विअरेबल ब्रँड असलेल्या गार्मिनने भारतात आपल्या दोन दमदार स्मार्टवॉच लाँच केल्या आहेत. या दोन्ही स्मार्टवॉचमध्ये अनेक नवनवीन फीचर्स देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या घड्याळांना सोलर चार्जिंग काच देण्यात आली आहे. म्हणजेच, हे वॉच सूर्यप्रकाशानेही चार्ज होऊ शकतं.

इन्स्टिंक्ट २एक्स सोलर (Instinct 2X Solar) आणि इन्स्टिंक्ट २एक्स सोलर-टॅक्टिकल एडिशन (Instinct 2X Solar - Tactical Edition) असे हे दोन स्मार्टवॉच आहेत. या घड्याळांमध्ये फ्लॅश लाईटही देण्यात आली आहे. ज्यामुळे अंधारात समोरच्या गोष्टी पाहता येणार आहेत.

काय आहेत फीचर्स

या घड्याळांमध्ये (Garmin Smartwatch) मोठे आणि हाय रिझॉल्यूशन डिस्प्ले, बिल्ट इन फ्लॅश लाईट, मल्टी ब्रँड जीएनएसएस आणि बऱ्याच प्रकारचे हेल्थ आणि फिटनेस सेन्सर देण्यात आले आहेत. यापूर्वीच्या इन्स्टिंक्ट २ च्या तुलनेत हे मॉडेल सोलरने ५० टक्के अधिक वेगात चार्ज होते असा दावा कंपनीने केला आहे.

यासोबतच यात रनिंग, सायकलिंग, जॉगिंग, स्विमिंग, स्ट्रेंथ ट्रेनिंग, ऑब्स्टॅकल रनिंग, वर्कआऊट आणि अन्य अ‍ॅक्टिव्हिटीज देण्यात आल्या आहेत. यामध्ये मोबाईल नोटिफिकेशन, कॉन्टॅक्टलेस पेमेंट आणि ट्रॅकिंग असे बरेच फीचर्स (Garmin Smartwatch Features) आहेत.

मजबूत डिझाईन

इन्स्टिंक्ट २एक्स सोलर या स्मार्टवॉचमध्ये ५० एमएम पॉलिमर केस वापरण्यात आली आहे. तसेच, घड्याळांमध्ये स्क्रॅच रजिस्टंट लेन्स देण्यात आली आहे. त्यामुळे हे घड्याळ अगदी मजबूत होतं. यूएस मिलिट्रीच्या मानकांनुसार या घड्याळांच्या थर्मल, शॉक आणि वॉटर रजिस्टंस चाचण्या घेण्यात आल्या आहेत. पाण्याखाली १० एटीएम एवढ्या खोलीपर्यंत हे घड्याळ काम करू शकतं.

अनलिमिटेड बॅटरी

या घड्याळाची स्क्रीन एक सोलर पॅनल म्हणूनही काम करते. त्यामुळे केवळ उन्हात ठेवलं तरी हे घड्याळ चार्ज होत राहतं. पूर्ण चार्ज झाल्यानंतर हे घड्याळ जीपीएस मोडमध्ये ६० तासांपर्यंत चालू शकतं. याव्यतिरिक्त चार्जिंग केबलच्या सहाय्यानेही याला चार्ज करता येतं.

किती आहे किंमत

इन्स्टिंक्ट २एक्स घड्याळाची किंमत ३३,४९० रुपयांपासून सुरू होते. घड्याळाचे टॉप मॉडेल हे ५५,९९० रुपयांना मिळते. अमेझॉन, टाटा सीलिक, टाटा लक्झरी, फ्लिपकार्ट किंवा नायका या वेबसाईट्सवरून तुम्ही ऑनलाईन या घड्याळाची खरेदी करू शकता. तसेच, गार्मिन आणि हेलिओस या दुकानांमध्ये ऑफलाईनही हे घड्याळ उपलब्ध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT