gemopai ryder supermax electric scooter
gemopai ryder supermax electric scooter  sakal
विज्ञान-तंत्र

Best Electric Scooter : सगळ्यात स्वस्त स्कूटर लॉन्च, फुल चार्जमध्ये 100 कि.मी. धावेल

सकाळ वृत्तसेवा

Gemopai Ryder Super Max : तुम्ही एक नवीन इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याचा विचार करत आहात, तर तुमच्यासाठी एक अतिशय स्वस्त स्कूटर लॉन्च करण्यात आली आहे. जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

80 हजारामध्ये इलेक्ट्रिक स्कूटर : जर तुम्ही देखील पेट्रोलच्या वाढत्या किमतींमुळे चिंतेत आहात आणि कमी किमतीत नवीन इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करू इच्छिता. तर तुमच्यासाठी जेमोपाई (Gemopai) कंपनीची नवीन राइडर सुपरमॅक्स (Ryder Super Max) इलेक्ट्रिक स्कूटर योग्य पर्याय ठरेल.

रायडर सुपरमॅक्स ईव्ही, मोटर, टॉप स्पीड आणि रेंज : कंपनीने या परवडणाऱ्या स्कूटरमध्ये BLDC हब मोटर वापरली आहे जी जास्तीत जास्त 2.7KW ची पॉवर जनरेट करते. ही स्‍कुटर 60kmph चा टॉप स्पीड आणि एकदा पूर्ण चार्ज केल्‍यावर 100kms पर्यंत जाते.

Best Electric Scooter

जेमोपाई कनेक्ट (Gemopai Connect) या अॅपद्वारे रिअल टाइम मॉनिटरिंग आणि स्कूटरबद्दल अपडेट्स जसे की स्पीड अलर्ट, बॅटरी, सर्व्हिस रिमाइंडर इत्यादी मिळतील.

रायडर सुपरमॅक्स इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत : कंपनीने ग्राहकांसाठी ही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर 79 हजार 999 रुपये (एक्स-शोरूम किंमत) च्या प्रास्ताविक किंमतीसह लॉन्च केली आहे.

या स्कूटरची विक्री कंपनीच्या शोरूममध्ये 10 मार्च 2023 पासून सुरू होईल. कंपनीच्या https://gemopai.com/ या संकेतस्थळाला भेट द्या आणि तुमची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर 2,999 रुपये भरून बुक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT