digital condom esakal
विज्ञान-तंत्र

Digital Condom : मार्केटमध्ये आलाय 'डिजिटल कंडोम', जाणून घ्या नेमकं आहे तरी काय अन् कसं काम करतं?

Camdom App Digital Condom : जर्मनीच्या प्रसिद्ध सेक्सुअल हेल्थ ब्रँड बिली बॉयने एक नवीन अॅप लाँच केला आहे, ज्याला 'डिजिटल कंडोम' म्हणून ओळखले जात आहे.

Saisimran Ghashi

Digital Condom : जर्मनीच्या प्रसिद्ध सेक्सुअल हेल्थ ब्रँड बिली बॉयने एक नवीन अॅप लाँच केला आहे, ज्याला 'डिजिटल कंडोम' म्हणून ओळखले जात आहे. या अॅपचे नाव कॅमडोम असून, त्याच्या मदतीने पर्सनल क्षणांमध्ये होणारे अनधिकृत ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग रोखले जाऊ शकते. स्मार्टफोनच्या कॅमेरा आणि मायक्रोफोनचा वापर न होण्यासाठी हे अॅप ब्लूटूथ तंत्रज्ञानाचा वापर करते. यामुळे खाजगी क्षण गुप्त राहतात.

कॅमडोमच्या निर्मात्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अॅप अनधिकृत रेकॉर्डिंग रोखण्यासाठी सज्ज असून, रेकॉर्डिंग थांबविण्यासाठी एखाद्या व्यक्तीने प्रयत्न केल्यास अॅप अलर्ट देऊन इशारा देतो. हे अॅप व्हेंज पोर्नसारख्या समस्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी तयार केले गेले आहे. सध्या ३० हून अधिक देशांत कॅमडोमला लोकप्रियता मिळाली आहे आणि लवकरच iOS वरही हे उपलब्ध होईल.

Digital Condom कसे काम करते?

कॅमडोम अॅप सुरू करण्यासाठी स्मार्टफोन जवळ ठेवून व्हर्च्युअल बटण स्वाइप करावे लागते. यामुळे कॅमेरा व मायक्रोफोनवर सुरक्षात्मक लॉक लावला जातो, ज्यामुळे कोणत्याही अनधिकृत रेकॉर्डिंगला रोखले जाते. जर कोणीतरी हे लॉक तोडण्याचा प्रयत्न केला, तर तंत्रज्ञानाने तो धोका ओळखला जातो आणि लगेचच अलार्म सुरू होतो. हे अलार्म त्या क्षणी उपलब्ध असलेल्या सर्व युजर्सना सुरक्षितता धोक्यात असल्याचा इशारा देतो.

लोकांकडून मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

कॅमडोम अॅपच्या लाँचनंतर समाजात यावर चर्चा सुरू झाली आहे. अनेकांनी या तंत्रज्ञानाचे कौतुक केले आहे, तर काहींनी या गरजेबद्दल खंत व्यक्त केली आहे. भविष्यात या तंत्रज्ञानाचा नक्कीच चांगला उपयोग होणार आहे आणि हे फायदेशीर ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT